mortuary
mortuary sakal
पुणे

‘ससून’च्या शवागाराचे लवकरच स्थलांतर

सकाळ वृत्तसेवा

पुढील ५० वर्षांचा विचार करून ससून रुग्णालयात अद्ययावत शवागार उभारले आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभाग नवीन इमारतीत स्थलांतरित होणार असून, त्याची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल.

पुणे - पुढील ५० वर्षांचा विचार करून ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) अद्ययावत शवागार (Mortuary) उभारले आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभाग नवीन इमारतीत स्थलांतरित होणार असून, त्याची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल.

ससून रुग्णालयाच्या परिसरात ११ मजली नव्या इमारतीमध्ये वैद्यकीय सेवा सुरू झाली आहे. या इमारतीच्या समोरच शवागार आहे. त्याचे स्थलांतर नवीन इमारतीत होणार आहे.

न्यायवैद्यकशास्त्र विभागाची ही इमारत बांधून पूर्ण झाली आहे. तिचे अंतर्गत कामही बहुतांश पूर्ण झाले आहे. सध्या काही सुरू असलेल्या तांत्रिक प्रक्रिया झाल्यानंतर हा विभाग लवकरच नवीन जागेत स्थलांतरित होईल, अशी माहिती विभागाचे प्रमुख डॉ. नरेश झंझाड यांनी दिली.

राज्यातील सर्वाधिक शवविच्छेदनाचे केंद्र

राज्यात सर्वाधिक शवविच्छेदन ससून रुग्णालयातील शवागारात होतात. दर वर्षी होणाऱ्या शवविच्छेदनाची संख्या सात हजारांवर गेली आहे. देशातील सर्वाधिक शवविच्छेदन होणाऱ्या केंद्रांपैकी हे एक प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे ५० वर्षांचा विचार करून या नवीन इमारतीची रचना केली आहे.

नवीन शवागार

शवविच्छेदन टेबलची संख्या वाढली

शवविच्छेदनासाठी सध्या तीन टेबल आहेत. ही संख्या तीन पटीने वाढवून नऊ केली आहे. त्यामुळे शवविच्छेदनासाठी लागणारा वेळ कमी होईल.

मृतदेह ठेवण्याची क्षमता वाढविली

सध्याच्या शवागाराची ३२ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. ही क्षमता नवीन इमारतीमध्ये १५० पर्यंत वाढविली. त्यामुळे एकाच वेळी झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनेतील मृतदेहांना व्यवस्थित येथे ठेवता येईल.

स्वतंत्र पंचनामा कक्ष

पोलिसांना पंचनामा करता यावा यासाठी इमारतीमध्ये स्वतंत्र कक्ष केला आहे. सध्या शवागाराच्या आवारात हा पंचनामा केला जातो.

लिफ्टची व्यवस्था

मृतदेह इमारतीच्या खालच्या मजल्यावरून वर घेऊन जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था केली आहे.

प्रशिक्षणाला प्राधान्य

विद्यार्थ्यांना शवविच्छेदनाचे धडे देणे आणि आरोग्य खात्यातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी येथे अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज कक्ष उभारला आहे. त्यात शवविच्छेदनाचे थेट व्हिडिओ बघण्याची सुविधा केली आहे.

‘नॅशनल मेडिकल कौन्सिल’ने (एनएमसी) नमूद केलेल्या निकषानुसार विभागात लेक्चर हॉल, डेमो रूम, प्रॅक्टिकल हॉल, संग्रहालय उभारले आहे.

अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असे हे शवागार आहे. त्यामुळे मृतदेह ठेवण्याची क्षमता वाढणार आहेच; पण नातेवाइकांना अधिक चांगल्या पायाभूत सुविधा येथे उपलब्ध केल्या आहेत.

- डॉ. नरेश झंझाड, विभाग प्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

शवागाराच्या नवीन इमारतीमुळे मृताचे नातेवाईक, पोलिस, डॉक्टर या सगळ्यांसाठी सोईचे होणार आहे. हा महाराष्ट्रातील पथदर्शी ठरेल इतका चांगला प्रकल्प साकारला आहे. त्यामुळे राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये याचे अनुकरण करता येईल.

- डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT