Sasoon Hospital sakal
पुणे

Sasoon Hospital : रुग्णालयातील बहुतांश कैद्यांची होणार कारागृहात रवानगी

ससून रुग्णालयात महिनोनमहिने उपचार घेणाऱ्या तरुण कैद्यांच्या दुखण्यावर आता इलाज सापडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ससून रुग्णालयात महिनोनमहिने उपचार घेणाऱ्या तरुण कैद्यांच्या दुखण्यावर आता इलाज सापडला आहे. पुढील दोन दिवसांत बहुतांश रुग्णांना परत कारागृहात पाठविले जाणार आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर घेतील, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

रुग्णालयात आलिशान खोल्यांमध्ये पाहुणचार घेणाऱ्या तरुण कैद्यांचे सर्वांत प्रथम ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले. तसेच त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. उपचारासाठी कैद्यांना रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता आहे का, याची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने त्रिस्तरीय समिती नियुक्त केली होती. त्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आवश्यकता असणाऱ्या कोणत्याही कैद्याचे उपचार नाकारले जाणार नाही. मात्र आवश्यकता नसलेल्यांना उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात आश्रयही दिला जाणार नाही, याबाबत समितीमध्ये अत्यंत स्पष्टता होती. त्या आधारावर ससून रुग्णालयात दाखल सात कैद्यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यात आला. रुग्णाला कारागृहात परत पाठविण्याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर घेणार आहेत, असेही समितीने स्पष्ट केले आहे.

उपचार पूर्ण झाले असतील, तर तातडीने रुग्णालयातून सोडा. कोणत्या रोगनिदान तपासण्या राहिल्या असतील, तर तातडीने पूर्ण करा आणि रुग्ण तपासण्यांना परवानगी देत नसेल तर तसा अहवाल प्रशासनाला कळवावा. तसेच रुग्णाला परत कारागृहात पाठविण्याची प्रक्रिया वेगाने करावी, असे निर्णय रुग्णालयाच्या कैदी समितीने शनिवारी घेतले.

तपासण्यांना कैद्यांचा विरोध

काही रुग्णांना ‘एमआरआय’सारख्या तपासण्या करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, संबंधित कैदी त्यास नकार देत आहेत. त्यामुळे पुढील रोगनिदान होत नाही. त्यातून रुग्णाला कारागृहात परत पाठविता येत नाही. अशी स्थिती काही कैदी रुग्णांची आहे. अशांचा अहवाल कारागृह प्रशासनाला पाठवावा. कैदी तपासण्यांना सहकार्य करत नसेल तर त्यांना सोडण्याचा निर्णय घ्यावा, असाही चर्चेचा एक सूर यातून निघाला.

कैदी समिती आठवड्यातून नियमितपणे कैद्याच्या प्रकृतीचा आढावा घेईल. त्यात उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मत जाणून घेतले जाईल. आवश्यकता असेल तरच कैद्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करू. याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, कैदी समिती, पथकप्रमुख आणि विभागप्रमुख या सर्वांना माहिती देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT