Sasoon Hospital sakal
पुणे

Sasoon Hospital : ससून रुग्णालयातील ‘स्पेशल वॉर्ड’ झाला आता कैद्यांचा कक्ष

राजकीय नेते, प्रशासनातील अतिवरिष्ठ अधिकारी, समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती फक्त अशाच ‘व्हीआयपीं’साठी राखीव असलेला ससून रुग्णालयातील ‘स्पेशल वॉर्ड’ आता कैद्यांचा कक्ष झाला आहे.

योगिराज प्रभुणे

पुणे - राजकीय नेते, प्रशासनातील अतिवरिष्ठ अधिकारी, समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती फक्त अशाच ‘व्हीआयपीं’साठी राखीव असलेला ससून रुग्णालयातील ‘स्पेशल वॉर्ड’ आता कैद्यांचा कक्ष झाला आहे. केवळ ‘विशेष’ कैद्यांची रवानगी या कक्षात केली जाते. तेथे त्यांच्यावर ‘उपचारांचे’ सोपस्कार महिनोंन् महिने सुरू राहतात. एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे रुग्ण उपचारासाठी पाठविल्याचे कागदी घोडे अगदी व्यवस्थित नाचविले जातात. त्याच वेळी कक्षांमध्ये कैदी मात्र मेजवान्यांवर मेजवान्या झाडत असतात.

अमली पदार्थाची तस्करीतील प्रमुख सूत्रधार ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाला. या पार्श्वभूमीवर या रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डचा ‘क्ष-किरण’ ‘सकाळ’ने घेतला. त्यातून ही माहिती पुढे आली आहे.

असा आहे कैदी वॉर्ड

येरवडा कारागृहात कैद्याला कोणता तरी आरोग्याचा त्रास होतो. त्यामुळे तेथून त्याला ससून रुग्णालयात दाखल केले जाते. आतापर्यंत कैद्यांसाठी डेव्हिड ससून रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड होता. पण, त्याचे नूतनीकरण सुरू असल्याने स्पेशल वॉर्डाचे रूपांतर कैद्यांच्या वॉर्डमध्ये करण्यात आले. तेथे दहा स्वतंत्र मोठ्या खोल्या आहेत. एका खोलीमध्ये दोघे आरामशीर राहू शकतात. प्रत्येक पाच खोल्यांमध्ये सामाईक स्वच्छतागृह आणि स्नानगृह आहे. खिडक्यांना गज बसवून स्पेशल वॉर्डाचे रूपांतर कैद्यांच्या कक्षात केले आहे.

कोणाला येथे ठेवतात?

ससून रुग्णालयात गेल्या काही दिवसांपूर्वी २४ कैदी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होते. त्यापैकी फक्त नऊ ‘विशेष’ रुग्णांनाच या कक्षात ठेवण्यात आले होते. इतर रुग्णांना जागा नसल्याने इतर वॉर्डमध्ये दाखल करून उपचार सुरू होते.

रुग्णालयातील कैदी समिती

कोणता कैदी दाखल झाला, त्याला काय झाले, कोण उपचार करत आहे, याची सविस्तर नोंद ठेवण्यासाठी कैदी समिती असते. रुग्णालयातील या त्रिसदस्यीय समितीचे २६ सप्टेंबरला पुनर्गठन करण्यात आले. त्यात वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सुजित दिव्हारे हे अध्यक्ष आहेत. डॉ. हरीश उम्रजकर आणि डॉ. प्रवीण देवकाते हे सदस्य आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली.

मुक्काम असा वाढतो

रुग्णालयातील कोणत्या तरी विभागाच्या डॉक्टरांकडे रुग्णांना दाखवले जाते. ते डॉक्टरांची तपासणीसाठी काही दिवस लागतात. त्यानंतर रुग्णाला आणखी दुसरा त्रास सुरू होतो. त्यामुळे त्याच्या पुढील तपासणीसाठी दुसऱ्या विशेषतज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठविले जाते. या प्रक्रियेत अतिशय काळजीपूर्वक कागदपत्रांवर नोंदी केल्या जातात.

यात कोणत्याही इतर कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होणार नाही, याची काटेकोर खबरदारी घेतली जाते. अशा प्रकारे दुसऱ्याकडून तिसरा, तिसऱ्याकडून चौथ्या डॉक्टरांकडे फाइल फिरते. कैद्याचा कक्षातील रुग्णाचा मुक्काम मात्र वाढत राहतो, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

कारागृहकडून विचारणा

कैद्याला नेमके काय झाले आहे, उपचाराला किती दिवस, कोणते उपचार सुरू आहेत, याची नेमकेपणाने माहिती कारागृह प्रशासनाकडून वेळोवेळी मागितली जाते. त्या बाबतचे पत्र वैद्यकीय अधीक्षकांना पाठवले जाते. त्यानंतर संबंधित डॉक्टर याची तपशीलवार माहिती देतात.

उपाय काय पुढे येतात?

ससून रुग्णालयात कैद्यांवर होणाऱ्या उपचारांचा वाढता कालावधी आता कारागृह प्रशासनाच्याही लक्षात आल्याची माहिती मिळते. त्यावर उपाय म्हणून कारागृहातच अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा एक पर्याय पुढे आला आहे.

फरार ललित पाटील याच्यावर होणार होती शस्त्रक्रिया

ससून रुग्णालयातून फरार झालेला अमली पदार्थांच्या तस्करीतील प्रमुख सूत्रधार ललित पाटील याच्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया ठरली होती, अशी माहिती पुढे येत आहे. तो फरार झाल्यानंतर त्यामागचे घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केला. त्यासाठी ससूनमधील वेगवेगळ्या डॉक्टरांशी संवाद साधला. त्यातून काही माहिती मिळाली; पण उपस्थित केलेले काही प्रश्न चौकशी सुरू असल्याने अनुत्तरितच राहिले. याचा सविस्तर अहवाल वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे. त्यातून माहिती समोर येईल, असा विश्वास काही डॉक्टरांनी व्यक्त केला.

काही वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील याला क्षयरोगाचे निदान झाले होते. तसेच, त्याला स्थूलता होती. त्याला हार्निया झाला होता. तसेच, त्याच्या पित्ताशयातही दोष होता. त्यामुळे त्याच्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच तो फरार झाला, अशी माहिती पुढे आली आहे.

‘क्ष-किरण’ काढण्याचे रहस्य

कैदी रुग्णावर मंगळवारी (ता. ३) शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, ती नेमकी कशाची होती, त्यासाठी ‘क्ष-किरण’ची काय आवश्यकता होती, याचे रहस्य वाढले आहे. याबाबत चौकशी सुरू आहे. त्यासाठी कागदपत्रे तपासण्यात येत आहे. या सर्वांचा उलगडा आयुक्तांना पाठविण्यात येणाऱ्या अहवालात करणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी स्पष्ट केले.

डॉक्टरांचे मत

रुग्णालयात दाखल झालेला सामान्य रुग्ण असो की कैदी, त्यांच्या उपचारासाठी संपूर्ण जबाबदारी ससून रुग्णालयाची असते. त्यात आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत. मात्र, रुग्ण कैदी असेल, तर त्याची सुरक्षा आणि देखरेख ही पोलिसांची जबाबदारी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अनुत्तरीत प्रश्न

  • शस्त्रक्रियेसाठी अडीच-तीन महिने का वाट पाहावी लागली?

  • कैद्याला शस्त्रक्रियेपूर्वी सहा तास रिकाम्या पोटी ठेवण्याचे नियोजन होते का?

  • शस्त्रक्रिया नेमकी कशाची होती?

  • कोणते डॉक्टर करणार होते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT