Sassoon Hospital Pune Esakal
पुणे

Sassoon Hospital Pune: ससूनमध्ये धक्कादायक प्रकार! बेवारस रुग्णांसोबत डॉक्टरांचे अमानवी कृत्य; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Sassoon Hospital Patients: पुण्यातील शासकीय रुग्णालय ससूनमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर संबंधितांवर येरवडा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशुतोष मसगौंडे

पुण्यातील शासकीय रुग्णालय ससूनमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथिल डॉक्टरच बेवारस रुग्णांना निर्जन स्थळी सोडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर संबंधितांवर येरवडा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आणि रितेश गायकवाड यांनी सापळा रचून हा घृणास्पद प्रकार समोर आणला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पुन्हा एका ससूनमधील गैरप्रकारांची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कसा समोर आला प्रकार?

ससून रुग्णालयात दादासाहेब यांनी दाखल केलेला रुग्ण बेपत्ता झाला होता. यानंतर त्यांना शंका आली आणि त्या रितेश यांच्याबरोबर एक सापळा रचला. त्यांनी आणखी एक रुग्ण ससूनमध्ये दाखल केला. दरम्यान पहाटेच्या वेळी रितेश ससूनबाहेर आपली रिक्षा घेऊन उभारले होते. तेव्हा ससूनमधील आदी नावाचे डॉक्टर रुग्णाला घेऊन आले त्यांनी रुग्णाला रिक्षातून निर्जणस्थळी सोडले आणि डॉक्टर कर्मचाऱ्यासह एका कारमधून निघून गेले.

यानंतर दादासाहेब आणि रितेश गायकवाड यांनी येरवडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला.

या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी आणि तक्रारदार रितेश गायकवाड यांनी याबाबत साम टीव्हीला प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, "आम्ही रुग्ण आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून फूटपाथवर जगणाऱ्या तसेच बेवारस रुग्णांना आश्रमात घेऊन जातो आणि सांभाळतो. दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की, ससूनचे डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार न करता त्यांना निर्जनस्थळी सोडत असतात. हा प्रकरा आम्हाला कळाल्यानंतर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आम्ही सापळा रचला होता."

"काल मी ससूनबाहेर उभा असताना आदी नावाचा एक डॉक्टर तिथे आला एका रूग्णाला सोडायचे आहे म्हणाला. पुढे त्याने सांगितले की, बेवारस रुग्णांना सांभाळायला, त्यांच्यावरील उपचाराची कार्यवाही करायला त्रास होतो. म्हणून आम्ही बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडत असतो. यासाठी आम्ही एक रिक्षावाला ठरवला असून, यासाठी त्याला आम्ही 500 ते 600 रुपये देतो," असे रितेश गायकवाड यांनी पुढे सांगितले.

दरम्यान या प्रकरणी कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT