Pune Porsche Crash esakal
पुणे

Pune Porsche Crash: अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलणाऱ्या डॉक्टरांची बिघडली प्रकृती...रुग्णालयात दाखल

Pune Porsche Crash: ससूनच्या दोन्ही डॉक्टरांनी ३ लाख रुपयासाठी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केली. तर आरोपीचे ब्लड सँपल कचऱ्यात फेकले. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

Sandip Kapde

Pune Porsche Crash

कल्याणी अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट फेरफार केल्या प्रकरणी पुणे पोलसांनी ससून रुग्णालयातील दोन डक्टारांना काल अटक केली. डॉ अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर असे त्या डॉक्टरांचे नाव आहे. दरम्यान डॉक्टर श्रीहरी हळनोर यांची प्रकृती बिघडली. पोलीस कोठडीत त्यांची प्रकृती बिघडली. ससूनच्या ब्लड विभागात ते कार्यरत होते.

डॉ अजय तावरे  यांच्या सांगण्यावरुन डॉ श्रीहरी हळनोर यांनी ब्लड सँपल बदलले होते. तर हळनोर सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात असून प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ससूनच्या दोन्ही डॉक्टरांनी ३ लाख रुपयासाठी ब्लड रिपोर्टमध्ये  फेरफार केली. तर आरोपीचे ब्लड सँपल कचऱ्यात फेकले. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

महाराष्ट्र काऊन्सिलकडून देखील दोन्ही डॉक्टरांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांच्याकडून सविस्तर खुलासा मागवण्यात आला. खुलासा आल्यानंतर दोन्ही डॉक्टरांवर कारवाई होणार आहे.

दुसऱ्याच्या रक्ताचा नमुना घेतला


वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, '१९ मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ससून हॉस्पिटलमध्ये घेतलेले रक्ताचे नमुने हॉस्पिटलच्या डस्टबिनमध्ये टाकण्यात आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेऊन तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला. सीएमओ डॉ श्रीहरी हळनोर यांनी हा रक्ताचा नमुना बदलला. तपासादरम्यान, ससूनच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे एचओडी अजय तावरे यांच्या सूचनेनुसार श्रीहरी हळनोर यांनी ते बदलल्याचे आम्हाला आढळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT