sassoon hospital stamp theft fake medical certificate distribution police pune marathi news 
पुणे

Pune News : ससूनमधून शिक्के चोरीला, बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करणाऱ्यास अटक

ससून रुग्णालयातून शिक्के चोरी करून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केल्याचा प्रकार

सकाळ वृत्तसेवा

Pune News : ससून रुग्णालयातून शिक्के चोरी करून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

याबाबत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश दामशेट्टी यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रकाश पांडुरंग मोंडकर (वय ३४, रा. वाघेरी, ता. कणकवली, जि. सिंधदुर्ग) आणि सत्पाल पवार (रा. ओगलेवाडी, ता. कराड) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोंडकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

या दोघांनी १४ डिसेंबर रोजी ससूनमधील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नजर चुकवून शिक्के चोरी केले. त्याआधारे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केले. ही बाब समोर आल्यानंतर डॉ. दामशेट्टी यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शरद माने करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT