पुणे

सासवडमध्ये जुगाराप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

CD

सासवड, ता. १२ : सासवड येथील खंडोबानगर झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी छापा टाकून विनापरवाना सुरू असलेल्या बिंगो जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत सुमारे १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सोपान आनंदा उबाळे (रा. हिवरकरमळा, सासवड) आणि किरण प्रकाश सोळंकी (रा. खंडोबानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रविवारी (ता. ११) सायंकाळी खंडोबानगरमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी लोकांकडून पैसे घेऊन बिंगो नावाचा जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पथकासह छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी ४ हजार ८२० रुपये रोख, १० हजार रुपये किमतीचा ३२ इंची टीव्ही आणि अंकांचा प्लास्टिक बोर्ड असा एकूण १४ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सासवड पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोस्टल रोडच्या बोगद्यात मध्यरात्री अपघाताचा थरार! सहा वाहनांची भीषण धडक, अनेक गाड्यांचे नुकसान

Indian Agriculture: हवामान बदलावर मात करण्याची भारतीय शेतीत ताकद! जमिनीतील कार्बन साठवणुकीतून सुपीकताही वाढणार; नीरीच्या संशोधनातून स्पष्ट

IND vs NZ 4th ODI Live: सोपा झेल टाकल्यावर टीका, ३९ वर्षीय रोहित शर्माने सुपर डाईव्ह मारून केली बोलती बंद Video Viral

दोन T20 World Cup, २ कसोटी वर्ल्ड कप फायनल, चॅम्पियन्स ट्रॉफी अन् वन डे वर्ल्ड कप...; ICC च्या बैठकीत बऱ्याच हालचाली

Pune Tunnel Project: पुणेकरांचा प्रवास होणार वेगवान! शहरात ३१ किलोमीटरचे भुयारी मार्ग; पुरंदर विमानतळापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी

SCROLL FOR NEXT