पुणे

एसटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

CD

​सासवड, ता. १२ : सासवड-जेजुरी रस्त्यावरील बायपास चौकात एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी एसटी चालकावर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. १२) दुपारी एकच्या सुमारास विशाल ओव्हाळ हे त्यांचे मित्र मुकेश दत्तू पवार आणि आकाश बंडू कारके यांच्यासोबत दुचाकीवरून (क्र. एम एच १४ एम जे २२२५) जेजुरीच्या दिशेने जात होते. या वेळी समोरून येणाऱ्या एसटी बसने (क्र. एम एच ०६ एस ८३३४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
एसटी बसचालक संदीप शंकर चव्हाण (रा. पिंपळे, ता. पुरंदर) याने बस भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून दुचाकीला धडक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या धडकेत ओव्हाळ यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला, तर त्यांचे मित्र मुकेश पवार आणि आकाश कारके हे गंभीर जखमी झाले आहेत.
मृताची पत्नी प्रिया ओव्हाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, सासवड पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT