सासवड, ता. २४ : बोपदेव घाट परिसरात चारचाकी गाडीचा पाठलाग करून प्रवाशांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी फिर्यादीच्या गाडीची काच फोडून सोन्याचे दागिने आणि दोन लाख ९२ हजार रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी सासवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जयदीप नवीनकुमार शहा (रा. चाकण) हे आपल्या कुटुंबासह चारचाकीने जात असताना, बोपदेव घाटातील कसेलो हॉटेल जवळ पाच ते सहा अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीला अडथळा निर्माण केला. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतरही आरोपींनी फिर्यादीचा पाठलाग करत ज्योती हॉटेल चौकाजवळ पुन्हा गाडी आडवी लावली. यावेळी एका आरोपीने गाडीची काच फोडून फिर्यादीला लोखंडी साखळीने मारहाण केली आणि गाडीची चावी हिसकावून घेतली.
मारहाणीच्या या गोंधळात फिर्यादीच्या गाडीत ठेवलेले २२ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन लाख ८० हजार रुपये रोख, तसेच फिर्यादीकडील १२ हजार रुपये असा ऐवज अज्ञातांनी लंपास केला. सासवड पोलिसांनी विविध कलमांनुसार अज्ञात पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.