पुणे

पुरंदर शैक्षणिक संकुलात अत्याधुनिक संगणक कक्ष

CD

सासवड, ता. ८ : ‘‘आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता संगणकीय कौशल्यात पारंगत व्हावे. स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानने उभारलेला हा संगणक कक्ष विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल,’’ असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे डिजिटल शिक्षण मिळावे, या उद्देशाने सासवड (ता. पुरंदर) येथील पुरंदर शैक्षणिक संकुलात स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने ५० संगणकांचा अत्याधुनिक कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाचे उद्‍घाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
नव्याने सुरू करण्यात आलेल्या या संगणक कक्षात ५० लेटेस्ट संगणक, हाय-स्पीड इंटरनेट, प्रोजेक्टर आणि प्रगत तांत्रिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यावेळी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानविषयक घोषणा देत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून विज्ञान दिन साजरा केला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी संगणकीय शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी प्रतिष्ठानमार्फत गरजू विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य देखील केले जाईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे हे आमचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी प्राचार्य इस्माईल सय्यद, सोमेश्वरचे माजी संचालक अरुण जगताप, रावसाहेब पवार, सुयशचे चैतन्य भोसले, साक्षी मेमाणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Mumbai: मुंबईत फेरीवाले दिसणं कायमचं बंद होणार, महापालिकेचा कारवाईसाठी आक्रमक पवित्रा

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

अपघातात २ कोटींच्या BMWचा चुराडा, जखमी अवस्थेत अडकून पडले; उद्योगपतीचा मृत्यू, चालक गंभीर

Ishan Kishan Girlfriend: ऑरेंज टँक टॉप, साधी जीन्स; वर्ल्ड कप विजयानंतर ईशान किशनसोबत दिसलेली गर्लफ्रेंड अदिती हुंडिया आहे तरी कोण? Video Viral

SCROLL FOR NEXT