सासवड, ता. २० : जुन्या वादातून मारहाणप्रकरणी सासवड (ता. पुरंदर) पोलिस ठाण्यात आठ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुभाष दत्तात्रेय शिवतारे (रा. सुपे खुर्द) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी व्यवसायाने डॉक्टर असून, सासवड येथे त्यांचा खासगी दवाखाना आहे. फिर्यादीनुसार शिवतारे हे १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास आपल्या सहकाऱ्यासोबत दुचाकीवरून जात असताना, सासवड- सुपे खुर्द रस्त्यावर शिवतारे आणि महेश राऊत यांच्यात ग्रामपंचायत राजकारणावरून वाद झाला. त्यातून मारहाण होऊन राऊत यांनी धमकी देत त्याने पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पैसे देण्यास नकार देताच आरोपीने शिवीगाळ करत रस्त्याच्या बाजूला पडलेल्या काठीने मारहाण केली. यामध्ये माझ्या हाताचे बोट फॅक्चर झाल्याचे शिवतारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तसेच, भांडण सोडवण्यासाठी आलेल्यांना शुभम आणि आकाश जाधव यांनाही आरोपीने दगड व लाथाबुक्क्यांनी मारले. जखमी अवस्थेत डॉक्टर तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जात असताना आरोपीच्या समर्थकांनी त्यांचा पाठलाग करून पुन्हा रस्त्यात अडवून, तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना पुन्हा मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सासवड पोलिसांनी महेश राऊत, स्वप्नील राऊत, लोकेश राऊत, अमोल पवार, आदित्य राऊत, सचिन राऊत, जितेंद्र राऊत आणि ओम राऊत (सर्व रा. सुपे खुर्द) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत महेश राऊत यांनी, डॉ. सुभाष शिवतारेंना मला मारहाण केली असून, त्यांच्या विरोधात आॅनलाईन तक्रार दिली असल्याचे सांगितले. सासवडमधील खासगी रुग्णालयांमधील अनियमिततेविरोधात आवाज उठवल्यामुळेच आपल्याला मारहाण करण्यात आली, असेही महेश राऊत यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.