पुणे

पुरंदरमध्ये विजेच्या लपंडावाविरोधात मंगळवारी आंदोलन

CD

सासवड, ता. ११ : पुरंदर तालुक्यात वीजपुरवठ्याच्या लपंडावामुळे पिके जळण्याची भीती निर्माण झाली असून, या समस्येविरोधात मंगळवारी (ता. १५) शेतकऱ्यांच्या वतीने सासवड येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात येणार आहे.
तालुक्यात विहिरीत पाणी असूनही जेमतेम पाच-दहा मिनिटे वीज टिकत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिसर्वे येथील शेतकरी शिवाजी कोलते यांनी आमदार विजय शिवतारे यांना पत्राद्वारे आपली कैफियत मांडली. ‘‘एक पाय वाफ्यात तर दुसरा मोटारीच्या खोक्यापाशी अशी आमची अवस्था झाली असून, रात्रंदिवस जागून डोळे सुजले आहेत,’’ अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे. शेतीसोबतच घरगुती वीजपुरवठाही वारंवार खंडित होत असून स्मार्ट मीटरच्या वाढीव बिलांमुळे नागरिक त्रस्त आहेत.
शेतीपंपांसाठी रात्री ९ ते पहाटे ३ चे वेळापत्रक असताना प्रत्यक्षात केवळ दीड-पावणेदोन तास वीज मिळत असल्याचे आमदार शिवतारे यांनी स्पष्ट केले. महावितरणने तातडीने तोडगा काढून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या नावाने ग्रामपंचायतीमार्फत लेखी निवेदन देऊन त्याची प्रत आपल्या कार्यालयात जमा करावी, असे आवाहनही शिवतारे यांनी केले आहे. तालुक्यात महायुतीची सत्ता असूनही विजेच्या प्रश्‍नाने पुरंदरवासीयांचे जीवन विस्कळित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS: पाकची उडाली झोप! 'ब्रिक्स'च्या घोषणापत्रात दहशतवादावर सडकून टीका; पहलगाम हल्ल्याचा उल्लेख

बाळाच्या संगोपनासाठी घरात आली मंगल; पण नंतर बदललं सगळंच! ‘अडकित्ता’मध्ये नेमकं काय घडलं? वाचा रिव्ह्यू

Pune Road Inspection: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात रस्ते दुरुस्तीचा बोजवारा; मिरवणूक मार्गांवर खड्डे, धोकादायक चेंबर अन् फुटपाथ

Palghar Bus Tragedy: शिवशाही बसच्या डिकीचे झाकण उघडताच शेतकरी सुभाष पागींचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

SCROLL FOR NEXT