राजेंद्र जगताप sakal
पुणे

सासवडचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप यांचे निधन

मध्यरात्री प्रदिर्घ आजाराने निधन झाले.

श्रीकृष्ण नेवसे : सकाळ वृत्तसेवा

सासवड : पुरंदर तालुका भाजपचे माजी अध्यक्ष आणि सासवड (ता. पुरंदर) नगरीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र नारायणआप्पा जगताप ऊर्फ आर.एन.भाऊ (वय ५६) यांचे आज मध्यरात्री प्रदिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगे कौशिक, मयूर, दोन बहिणी असा परिवार आहे. सासवडचे विद्यमान नगरसेवक संजय गणपत जगताप यांचे ते चुलत बंधू होत. 1992 - 93 मध्ये ते सासवड नगरपालिकेवर निवडून आले होते. त्यावेळी पंचवार्षिकच्या पहिल्याच वर्षी त्यांना नगराध्यक्षपद मिळाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षातही त्यांनी तत्पूर्वी काम केले होते. निधनानंतर सासवड येथे कर्हा नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बहुसंख्य विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. मान्यवर नेते व पदाधिकाऱ्यांनी श्रध्दांजली अर्पण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT