swachh survekshan sakal
पुणे

Swachh Survekshan : सासवड, लोणावळा नगरपालिका ‘स्वच्छ सर्वेक्षणा’त देशात सर्वोत्कृष्ट

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रथम तीन क्रमांकांमध्ये येण्यासाठी जिल्ह्यातील सात ते आठ शहरांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील सासवड (ता. पुरंदर) आणि लोणावळा (ता. मावळ) या दोन्ही नगरपालिका सलग दुसऱ्यांदा देशात सर्वोत्कृष्ट ठरल्या आहेत.

या दोन्ही नगरपालिकांना गुणानुक्रमे देशातील पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट नगरपालिकांमध्ये स्थान मिळविले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या गुरुवारी (ता.११) या नगरपालिकांचा गौरव केला जाणार आहे.

या दोन्ही नगरपालिकांना एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपालिकांच्या वर्गवारीमध्ये पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे जिल्ह्याने याआधी माझी वसुंधरा ४.० मध्ये राज्यपातळीवर सर्वोत्कृष्ट जिल्हा व सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी असा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर आता देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षण क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रथम तीन क्रमांकांमध्ये येण्यासाठी जिल्ह्यातील सात ते आठ शहरांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. यामध्ये बारामती, इंदापूर, जेजुरी, शिरूर, भोर, सासवड, लोणावळा यांचा समावेश होता. यापैकी प्रत्येक नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत यापूर्वी विविध गटामध्ये राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त केलेले आहेत.

सासवड नगरपालिकेने घनकचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया, ४० ते ५० टक्के सांडपाण्याचा पुनर्वापर, शहर सौंदर्यीकरणांतर्गत शहरात १८ ठिकाणी विविध शिल्पांची उभारणी, प्लास्टिकचा रस्त्यांच्या कामासाठी पुनर्वापर, बांधकाम व अन्य साहित्यांची योग्य विल्हेवाटीची व्यवस्था केली होती. याशिवाय टाकाऊ वस्तूंपासून विविध शिल्प आकारलेले ‘वेस्ट टू वंडर पार्क’ आकारले आहे. यामुळे सासवड शहराला थ्री स्टार व वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे.

लोणावळा नगरपालिकेनेही सांडपाणी व्यवस्थापनासाठीचा ‘एसटीपी’ हा प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू केला. घनकचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया, शहरातील ४० ते ५० सांडपाण्याचा पुनर्वापर, शहरात रिड्यूस, रियूज, रिसायकल (आरआरआर) केंद्राची स्थापना करून २ मेट्रिक टन इतक्या वस्तू लोकांकडून जमा केल्या असून. त्यातील १.५ मेट्रिक टन वस्तू गरजू लोकांना देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीदेखील जिल्ह्यातील लोणावळा, सासवड, बारामती आणि इंदापूर शहरांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले होते.

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सासवड आणि लोणावळा या दोन्ही नगरपालिकांनी विशेष मेहनत घेऊन, विविध नावीन्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी सुरु केली आहे. यामध्ये नागरीकांना सहभागी करून घेतल्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT