पुणे

सासवड पालिकेचा वर्धापनदिन साजरा

CD

सासवड, ता. ४ : ऐतिहासिक वारसा असलेल्या सासवड (ता. पुरंदर) नगरपालिकेचा १५७वा वर्धापनदिन रविवारी (ता. ४) उत्साहात साजरा करण्यात आला.
सासवड नगरापालिकेची स्थापना ४ जानेवारी १८६९ रोजी झाली आहे. वर्धापनदिननिमित्त पालिकेची इमारत तसेच छत्रपती शिवराय, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांसह पालिकेच्या अनेक माजी- माजी सदस्य आणि नागरिकांनी भेट दिली. सासवडकर नागरिकांच्या सहकार्याने पालिका मुलभूत सेवा सुविधा पुरविण्यासह शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण व इतर उपक्रमांतही अग्रेसर राहिली असून, लोकसहभागाच्या जोरावर भविष्यातही हे यश कायम राखण्याचा निर्धार नगराध्यक्षा जगताप यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दिवसभरात आमदार विजय शिवतारे, गटनेते अजित जगताप, विरोधी गटनेते मंदार गिरमे, नगरसेवक मनोहर जगताप, लिना वढणे, बाळासाहेब भिंताडे, ज्ञानेश्वर जगताप, शितल भोंडे, स्मिता सुहास जगताप, सोपान रणपिसे, रत्ना म्हेत्रे, राजन जगताप, अर्चना जगताप, स्मिता उमेश जगताप, वैभव टकले, प्रितम म्हेत्रे, दिपाली जगताप, प्रियांका जगताप, प्रदीप राऊत, ज्ञानेश्वर गिरमे यांसह मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

Latest Marathi News Live Update : नंदूरबारमध्ये जखमी अवस्थेत सापडले बिबट्याचे बछडे; वनविभागाकडून उपचार सुरू

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

मुस्लिम हिंदूंपेक्षा चांगला कसा? मुमताज यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया; म्हणाल्या- एकीला सोडून दुसरीशी लग्न...

SCROLL FOR NEXT