Plastic Waste Holi Festival at College Sakal
पुणे

सासवड : प्लास्टिक कचऱ्याची होळी करत महाविद्यालयात सण साजरा

वाघीरे महाविद्यालयात होळी सण साजरा

दत्ता भोंगळे

सासवड ( ता. पुरंदर ) : येथील वाघीरे महाविद्यालयात होळीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 'स्वछता अभियान' राबविण्यात आले. सदर स्वछता अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी श्रमदान करून महाविद्यालय परिसराची स्वछता करून जैविक व प्लाष्टीक कचरा मोठ्या प्रमाणावर गोळा करुन प्लाष्टीक कचऱ्याची होळी करीत विद्यार्थ्यांनी होळीसणाला दिली वेगळी दिशा. यावेळी प्लाष्टीक न वापरण्याचा संकल्प सर्व स्वयंसेवकांनी केला.यानिमित्ताने प्लाष्टीक कचऱ्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुषमा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वछता अभियान राबविण्यात आले. हे अभियान यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम आधिकारी डॉ. विशाल पावसे, प्रा. अनिल झोळ, प्रा.समीर कुंभारकर, प्रा. भाग्यश्री मद्भाविकर यांनी प्रयत्न केले.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संपत जगदाळे, डॉ. सुभाष वाव्हळ तसेच डॉ. नाना झगडे, प्रा. दत्तात्रय संकपाळ, प्रा. किरण गाढवे, प्रा.भानुदास गायकवाड व एम. जी. जगताप उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

IND vs AUS Semi Final: जेमिमा रॉड्रिग्जचे खणखणीत शतक! हरमनप्रीत कौरची हुकली सेंच्युरी, ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणारी भागीदारी

India vs Pakistan अन् मोहसिन नक्वी पुन्हा 'राडा'! पुढील महिन्यात Asia Cup मध्ये हायव्होल्टेज सामना; जाणून घ्या डिटेल्स

Prakash Ambedkar : येत्या ३ महिन्यांत भारत-पाक युद्ध! वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टिका

SCROLL FOR NEXT