पुणे

सासवड ग्रामीण रुग्णालय आता 'उपजिल्हा रुग्णालय'

- श्रीकृष्ण नेवसे

सासवड (जि.पुणे) - येथील राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाचा लवकरच विस्तार होणार आहे. सासवड (ता. पुरंदर) येथील हे रुग्णालय आता 30 खाटांवरुन 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. त्याबाबत शासनाने `खास बाब` म्हणून सासवड ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याबाबतचा नुकताच शासनादेश काढला आहे.

पुरंदरचे लोकप्रतिनीधी व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शासनादेशासह ही माहिती दिली. सासवडचे ग्रामीण रुग्णालय हे तालुक्याच्या मुख्य ठिकाणचे शासकीय आरोग्य सेवेचे रुग्णालय आहे. येथे अंतःरुग्ण व बाह्यरुग्ण कक्षात मोठ्या संख्येने रुग्ण येतात. त्यामुळे एकीकडे जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयास चांगली इमारत व सुविधा देताना.. सासवड ग्रामीण रुग्णालयाची क्षमता वाढीसाठी.. आरोग्य सेवा, रुग्णालये (राज्यस्तर) सहसंचालक यांच्यामार्फत प्रस्ताव दिला होता. त्यास पाठपुराव्याने नुकतीच मान्यता मिळाली. सासवडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन केल्याने रुग्णालय 30 खाटांवरुन आता 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी अंदाजपत्रक व नकाशे तयार करण्याची कार्यवाही हाती घेण्यात यावी., असे आदेश आहेत. त्याशिवाय वाढीव मनुष्यबळ व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत 
स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल., असेही आदेशात म्हंटले आहे. सासवड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नामदेव शिंदे यांनी बदलाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. रुग्णालयाचे सदस्य सचिन जाधव यांनी रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाबाबत श्री. शिवतारे यांना धन्यवाद दिले आहेत.  

निर्णयाने रुग्णालयात नविन काय मिळणार ?
सध्या सासवड ग्रामीण रुग्णालयात 3 डाॅक्टर आहेत, नव्या मंजूरीत 7 डाॅक्टरर्स मिळू शकणार * फिजीशियन, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, सर्जन, भुजतज्ज्ञही मिळणार * अधिपरिचारिका सध्य 7 आहेत, त्या 12 होणार * चतुर्थ श्रेणी सेवक 7 आहेत, ते वाढून 9 होणार * भविष्यात सोनोग्राफी मशिन मिळण्याचा मार्ग सुकर होणार * 30 हून 50 खाटांचे उपजिल्हा दर्जाचे रुग्णालय होऊन त्यानुसार अौषधपुरवठाही वाढणार आहे 

जेजुरी ग्रामीण रुग्णालयापाठोपाठ सासवड ग्रामीण रुग्णालयालाही आता आणखी नवी इमारत मिळेल. तसेच सासवडला उपजिल्हा रुग्णालय दर्जा मिळत आहे. जागेचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत. तोपर्यंत इमारत अंदाजपत्रक व नकाशे करण्याची कार्यवाही लवकरच होईल.`` 
- विजय शिवतारे, राज्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: फिलिप सॉल्टची तुफानी फटकेबाजी, दिल्लीविरुद्ध ठोकलं आक्रमक अर्धशतक

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT