पुणे

क्राईम १०

CD

मारहाणप्रकरणी
दोघांवर गुन्हा

सातारा, ता. १० : आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून शिवीगाळ करत एकाला रॉडने मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इर्शाद रज्जाक शेख (रा. शिवाजी उदय मंडळासमोर, शुक्रवार पेठ) व पप्पू ऊर्फ सचिन मोहिते (रा. आर. के. बॅटरीशेजारी, रविवार पेठ) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत वैभव सुंदरराव पाटील (वय ४६, रा. शिवाजीनगर, शाहूपुरी, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. आर्थिक व्यवहारासंदर्भात बोलायचे असल्याचे सांगून संशयितांनी फोन करून बोलावले. त्यानंतर शिवीगाळ करत तुला दाखवतो, अशी धमकी देण्यात आली, तसेच एका संशयिताने हातातील रॉडने मारहाण करून जखमी केल्याचे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार सणस तपास करत आहेत.
....................
साताऱ्यातून
दुचाकी चोरीस

सातारा : तहसीलदार कार्यालय परिसरातून दुचाकी चोरीला गेली आहे. विनायक जिजाबा कदम (रा. कारंडवाडी, ता. सातारा) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला हवालदार पोतेकर तपास करत आहेत.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

CSK पाठोपाठ मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने केली नव्या प्रशिक्षकाची घोषणा! RCB चा कोच फोडला, कोण आहे तो?

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगातील वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचं महत्वाचं भाष्य

प्रमोशनला आला नाही म्हणून वाद, १ कोटींचा दंड; अंकित मोहनने मांडली त्याची बाजू, म्हणाला...

SCROLL FOR NEXT