पुणे

तिसऱ्या डोळ्यांची नजर धूसर

CD

साताऱ्यात तिसऱ्या डोळ्यांची नजर धूसर

पोलिस दलाचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरू; खासगीपैकी अनेक बंदच, सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

सातारा, ता. १४ : शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सार्वजनिक सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि विविध घटनांच्या तपासासाठी पोलिस दलाच्‍या अखत्‍यारीतील ३५ सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचा आधार ठरतात. पोलिस दलाचे कॅमेरे सुरू असले तरी शहरातील विविध भागांत सार्वजनिक हालचाली टिपण्यासह स्‍वसुरक्षेसाठी बसवलेल्‍या सुमारे खासगी ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी अनेक कॅमेरे बंद आहेत. या बंद कॅमेऱ्यांमुळे शहराच्‍या तिसरा डोळ्याची नजर धूसर झाल्याचे चित्र आहे.
शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे अशा विविध भाग असून, याठिकाणी दररोज हजारो सातारकरांची मोठी गर्दी विविध कामांसाठी होत असते. भौगोलिकरीत्‍या सलग असणाऱ्या साताऱ्याची विभागणी पोलिस दलाने तांत्रिकरीत्‍या दोन पोलिस ठाण्‍यांत केली आहे. यापैकी शाहूपुरी पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत २५ कॅमेरे, तर शहर पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत दहा उच्‍च दर्जाचे कॅमेरे आहेत. याद्वारे नियंत्रण कक्षातून मुख्‍य भागांवर पोलिस कर्मचारी लक्ष देत असतात. एखादी घटना घडल्यानंतर संशयित व्यक्ती किंवा वाहनाचा माग काढण्यासाठी या कॅमेऱ्यांचा पोलिसांना मोठा उपयोग होतो.
शहराची विभागणी विविध पेठा आणि भागांत झाली आहे. या भागातील बहुतांश व्‍यावसायिक, बँका, पतसंस्‍था तसेच इतर संस्‍था, संघटनांनी स्‍वपरिसर सुरक्षेसह सार्वजनिक सुरक्षेसाठी सामाजिक उत्तरदायित्‍वातून सीसीटीव्‍ही बसवले आहेत. याची संख्‍या पोलिस दलाच्‍या माहितीनुसार, सुमारे पाचशेच्‍या घरात आहे. यापैकी अनेक कॅमेरे बंद असल्‍याने सणासुदीच्‍या काळात तसेच गुन्‍हेगारी घटनांचा माग काढताना पोलिस दलास त्‍याचा अपेक्षित उपयोग होत नाही. यामुळे अनेकदा अनेक पातळीवर आणि बाबींवर पोलिसांना सामाजिक सुरक्षा अबाधित राखण्‍यासह तिला धोका पोहोचवणाऱ्यांपर्यंत पोहोचण्‍यात पोलिसांसमोर अडचणी येतात. या अडचणी दूर करण्‍यासाठी पोलिस दलाने आगामी गणेशोत्स‍व, नवरात्रोत्‍सव तसेच दसरा, दिवाळीच्‍या अनुषंगाने सर्वच खासगी कॅमेऱ्यांची मालकी असणाऱ्यांना त्‍यांच्‍या देखभाल, दुरुस्‍तीसह इतर बाबींच्‍या सूचना संबंधितांना करणे आवश्‍यक आहे.
........

पालिकेनेही सर्वेक्षण करावे

शहरातील सार्वजनिक शांततेची जबाबदारी पोलिस दलावर असली तरी त्‍यातून पालिकेला आपले अंग बाजूला काढू घेता येणार नाही. यामुळे पालिका, पोलिसांनी सणासुदीच्‍या नियोजनात सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांच्‍या अनुषंगाने सर्वेक्षण करून आराखडा करत खासगीधारकांना योग्‍य त्‍या सूचना करणे आवश्‍यक आहे.
.............

ब्लाइंड स्पॉट धोकादायक

राजपथावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्‍यात आली आहे. या वाढलेल्‍या झाडांमुळे रस्‍त्‍याच्‍या दिशेने असणाऱ्या अनेक कॅमेऱ्यांच्‍या चित्रीकरणाच्‍या क्षमतेवर मर्यादा येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी एखादी घटना घडली आणि जवळचे कॅमेरे बंद असतील तर पोलिसांच्या तपासासमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे उत्सवापूर्वी शहरातील सर्व कॅमेऱ्यांची तपासणी करून ‘ब्लाइंड स्पॉट’ शोधत त्‍याठिकाणी आवश्‍यक ती यंत्रणा उभारणे आवश्‍यक आहे.
...........
फुटेज जतन व्‍हावे
--------
शहरातील मिरवणूक मार्गावर असणाऱ्या खासगी तसेच शासकीय कॅमेऱ्यांचे फुटेज जतन करण्‍यासाठीची यंत्रणा पालिकेसह पोलिस दलाने उभारणे आवश्‍यक आहे. अनेकदा कॅमेऱ्यांनी टिपलेल्‍या हालचाली साठवण क्षमतेच्‍या अभावी नंतरच्‍या काळात उपलब्‍ध होत नाहीत.
................
फलकांचाही अडसर
नागरिकांनी सामाजिक जबाबदारीतून स्‍वत:सह परिसर सुरक्षेसाठी अनेक कॅमेरे बसवले आहेत. मात्र, अनेकदा त्‍यांच्‍यासमोर शुभेच्‍छा तसेच जाहिरात फलक उभारण्‍यात येतात. या फलकांमुळे देखील कॅमेऱ्याच्‍या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्‍याचे एखादी घटना घडल्‍यानंतर त्‍याच्‍या तपासादरम्‍यान पोलिसांच्‍या निदर्शनास येते.
...............
कोट -

व्‍यापाऱ्यांनी रस्‍त्‍याकडेला बसवलेल्‍या कॅमेऱ्यांचा तपासात मोठा उपयोग होतो. सद्यःस्‍थितीत अनेक खासगी संस्‍था, व्‍यापाऱ्यांचे कॅमेरे बंद आहेत. ते कॅमेरे आगामी सण लक्षात घेत व्‍यापारी, नागरिकांनी कार्यान्वित करून घेण्‍याची आवश्‍यकता आहे.

- सचिन म्‍हेत्रे, पोलिस निरीक्षक, सातारा शहर पोलिस ठाणे.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT