शहर बस सेवा...मास भूमिका
......................
एमआयडीसींना जोडणाऱ्या
बससेवेसाठी ‘मास’चा पुढाकार
सातारा शहरासाठी सक्षम, नियमित, विस्तारित आणि औद्योगिक वसाहत परिसरांना जोडणारी बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ साताराची पहिल्यापासूनची ठाम भूमिका आहे. ही मागणी केवळ प्रवाशांची नसून साताऱ्याच्या सर्वांगीण विकासाची गरज आहे. त्यासाठी ‘सकाळ’ने घेतलेल्या भूमिकेला मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा (मास) कायम पाठिंबा राहणार आहे. आम्हीही प्रशासनाकडे त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही मासच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
साताऱ्यात शहर बससेवा सुरू झालीच पाहिजे, याबाबतची आग्रही भूमिका ‘सकाळ’ने घेतली आहे. त्याला साथ देत येथील औद्योगिक वसाहतीतील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (मास) पदाधिकाऱ्यांनी शहरासह औद्योगिक वसाहत परिसरातील हजारो कर्मचारी, कामगार, विद्यार्थी आणि नागरिक दररोज प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून आहेत. त्यामुळे बससेवा सुरू करणे आवश्यक आहे, अशी व्यथा ‘सकाळ’कडे मांडली आहे, तसेच शहर बससेवा सुरू होण्यासाठी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे.
सातारा शहरासह लगत असलेल्या औद्योगिक वसाहत परिसरातील हजारो कर्मचारी, कामगार, विद्यार्थी आणि नागरिक दररोज प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून आहेत. चांगली बससेवा उपलब्ध झाल्यास कर्मचारी व कामगारांना सुरक्षित, किफायतशीर आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळेल. विशेषतः औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ये- जा सुलभ होऊन त्यांच्या वेळेची व प्रवासखर्चाची बचत होईल. यामुळे उद्योगांनाही मनुष्यबळाची उपलब्धता व वेळेचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल. शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या कमी करण्यासही सार्वजनिक बससेवा महत्त्वाची भूमिका बजावेल. पर्यावरणपूरक व शाश्वत शहराच्या दृष्टीनेही ही सेवा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सातारा शहरासाठी सक्षम, नियमित, विस्तारित आणि औद्योगिक परिसरांना जोडणारी बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ साताराची ठाम भूमिका आहे. ही मागणी केवळ प्रवाशांची नसून साताऱ्याच्या सर्वांगीण विकासाची गरज आहे, असे स्पष्ट मत मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी व्यक्त केली आहे.
.....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.