पुणे

सातारा जिल्हा बँक निवडणूकीत नऊ जण बिनविरोध

CD

सातारा जिल्हा सहकारी बँक
निवडणुकीत नऊ जण बिनविरोध

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी संचालकपदाच्या २१ जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या. आता १२ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्यांना निवडणूक लढता येणार नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अडचणीत आलेल्या दिग्गज नेत्यांनी बुधवारी (ता. २१) निवडणुकीतून माघार घेतली.
अखेरच्या दिवशी मंत्री मकरंद जाधव पाटील, आमदार डॉ. अतुल भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर, सर्जेराव सावंत, नंदकुमार मोरे, सत्यजित वीर, ऋतुजा पाटील, मंगल पाटील, सोमनाथ धुमाळ या नऊ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित १२ जागांसाठी येत्या एक नोव्हेंबरला मतदान होणार असून, तीन नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी झाल्या. महायुतीतील घटक पक्षांत जिल्हा बॅंकेतील दहा जागांचे वाटप होणार होते. त्यापूर्वी भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल फर्नवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक हॉटेल प्रीती एक्झिकेटिव्ह येथे सकाळी झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांची एकत्रित बैठक हॉटेल फर्नवर झाली. यामध्ये जागा वाटपाचे सूत्र भाजपला पाच, राष्ट्रवादीला तीन आणि शिवसेनेला दोन असे ठरले. त्यानंतर सर्व नेते राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील यांच्या निवासस्थानी गेले. तेथे कऱ्हाड सोसायटीच्या बिनविरोधसाठी बैठक झाली. त्यानंतर सर्व नेते दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान जिल्हा बॅंकेतील अर्ज काढून घेण्यासाठी येऊ लागले. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, प्रभाकर घार्गे, प्रदीप विधाते, कांचन साळुंखे या संचालकांचा समावेश आहे. आमदार मनोज घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. केवळ जावळी सोसायटीतून विठ्ठल गोळे यांचा अर्ज ठेवला. त्यानंतर विविध मतदारसंघातील उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी येत होते.

अशा होणार लढती
- जावळी सोसायटी मतदारसंघ : ज्ञानदेव रांजणे, विठ्ठल गोळे
- महाबळेश्वर सोसायटी : रूपाली राजपुरे, संजय मोरे
- कऱ्हाड सोसायटी : उदयसिंह पाटील, धनंजय पाटील
- पाटण सोसायटी : सत्यजित पाटणकर, मंत्री शंभूराज देसाई
- कोरेगाव सोसायटी : सुनील खत्री, सुनील माने
- माण सोसायटी : मनोजकुमार पोळ, शेखर गोरे, मंत्री जयकुमार गोरे
- खंडाळा सोसायटी : श्यामराव गाढवे, संजीव गाढवे, अजय भोसले
- फलटण सोसायटी : संजीवराजे नाईक निंबाळकर, समशेर नाईक निंबाळकर
- औद्यागिक विणकर मजूर संस्था मतदारसंघ : चंद्रकांत जाधव, सुनील वाघ
- अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग : दीपक चव्हाण, रवींद्र बडेकर, सुरेश गायकवाड, सत्यवान कांबळे
- इतर मागास प्रवर्ग : योगेश फडतरे, संदीप पांचागणे
- विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग : सुनील वाघ, अर्जून काळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwajeet Kadam Statement : सांगली जिल्हा बँकेतील बिनविरोध निवडीचा पदवीधर निवडणुकीवर परिणाम? विश्वजीत कदम स्पष्टच म्हणाले!

Dausa Case: अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये सामूहिक अत्याचार..अचानक झाली प्रसूती; नवजात बाळाचा मृत्यू

Sonia Gandhi : सोनिया गांधींची इंस्टाग्रामवर इंट्री, ३ तासांत ५९ हजार लाईक्स अन् १३ हजार फॉलोवर्स; नव्या सुरुवातीची राजकीय वर्तुळात चर्चा

Latest Marathi News Live Update : सौरव दास, आशुतोष रांका आज दिल्ली पोलीस गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत

मुलांना 'नीट बोल' म्हणून टोकताय? 'या' दबावामुळे वाढते तोतरेपणाची भीती; शाळेत १०० पैकी ५ मुलांमध्ये दिसतात 'ही' लक्षणे...

SCROLL FOR NEXT