पुणे

सातारा राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची जिल्हा बँकेस भेट

CD

सातारा जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांच्या
प्रगतीत मोलाचे योगदान ः डॉ. खर्चे

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील कृषी व सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य बँक असून, बँकेस देशपातळीवर व राज्यपातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. शेती क्षेत्रातील आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर व त्याची बँकेच्या योजनेसोबत सांगड घालून बँक शेतकऱ्यांच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत आहे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केले.
महात्मा मुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. खर्चे यांनी इतर शास्त्रज्ञांसोबत सातारा जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते.
या भेटीप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे विस्तार संचालक डॉ. जी. के. ससाणे, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांचे शास्त्रज्ञ डॉ. महेश बाबर, डॉ. भूषण यादगीरवार, आयसीआरचे शास्त्रज्ञ डॉ. जितेंद्र कदम, बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. राजीव गाढवे, सर्व विभागांचे उपव्यवस्थापक, अधीक्षक, कृषी अधिकारी, कृषी तज्ज्ञ व तांत्रिक अधिकारी उपस्थित होते.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँक विद्यापीठासोबत राबवीत असलेल्या शेतीपूरक उपक्रमांची विस्तृत माहिती दिली. या वेळी झालेल्या चर्चेत डॉ. खर्चे यांनी बँक विद्यापीठासोबत विविध उपक्रम राबवीत असल्यामुळे हे देशातील कृषी प्रगतीचे आगळे वेगळे मॉडेल असल्याचे नमूद केले. बँकेचे कृषी अधिकारी अमृत भोसले यांनी बँक राबवीत असलेल्या एआय आधारित ऊस उत्पादन वाढ उपक्रमाबद्दल माहिती दिली. बँकेचे अंतर्गत तपासणी विभागाचे अधीक्षक एस. पी. मोरे यांनी आभार मानले.

W42032
सातारा : जिल्हा बॅंकेत कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना डॉ. राजेंद्र सरकाळे. त्या वेळी डॉ. जी. के. ससाणे, डॉ. महेश बाबर, डॉ. भूषण यादगीरवार, डॉ. जितेंद्र कदम, डॉ. राजीव गाढवे व अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेतील मृताच्या पत्नीनं संपवंल आयुष्य, २ चिमुकल्या मुली महिन्याभरात आई-वडिलांच्या मायेला पोरक्या

World Organ Donation Day 2026: फक्त अवयवदानाचा फॉर्म भरून होत नाही! मृत्यूनंतर तुमचे अवयव कसे दान केले जातात? जाणून घ्या प्रत्येक टप्पा

Vijay Mallya News: मल्ल्या-बँकांमधील वाद संपवण्याची गरज! मुंबई हायकोर्टाचे मोठे निरीक्षण; काय म्हणाले कोर्ट?

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

Shaktipeeth Highway Protest : जयंत पाटील, राजू शेट्टी एकत्र! 'शक्तिपीठ' रद्द करण्यासाठी सांगलीत मोठ्या आंदोलनाची घोषणा; 31 गावांतील 3 हजार एकरांहून अधिक जमीन बाधित

SCROLL FOR NEXT