साताऱ्यात रविवारी
गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
सातारा, ता. १ : मुलांना मातीत खेळण्याचा आनंद देतानाच त्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव मिळावा, तसेच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने भारती फाउंडेशनच्या वतीने ‘आम्ही देऊ माती, तुम्ही बनवा गणपती’ या उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती भारती फाउंडेशनचे प्रमुख रवींद्र भारती यांनी दिली. उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे.
ही गणपती बनविण्याची कार्यशाळा रविवारी (ता. ६) सकाळी आठ ते दहा या वेळेत गुरुवार बागेत होणार आहे. कार्यशाळेत पाच ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना या कार्यशाळेत सहभागी होता येणार असून, प्रवेश मर्यादित ठेवण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून टीम कलाकारीच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या कार्यशाळेत राष्ट्रीय शिल्पकार पुरस्काराचे उपविजेते मंदार लोहार, प्रसिद्ध मूर्तिकार पोपट कुंभार व महेश लोहार हे विद्यार्थ्यांना गणपती बनविण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करणार आहेत.
सहभागी विद्यार्थ्यांना गणपती बनविण्यासाठी शाडू माती, गणपतीचा बेस बोर्ड तसेच सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उपक्रमासाठी शुक्रवारपर्यंत (ता. ४) नोंदणी करता येणार असून, माहितीसाठी ॲड. शुभम तंटक - ९४२१५ ७६ ४४८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.