पुणे

सभा

CD

...तर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

राजू भोसले; जिल्हा परिषदेची आरोग्य समितीची सभा

सातारा, ता. ११ : स्मार्ट पीएचसीच्या माध्यमातून जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अडीअडचणी सोडवून नागरिकांना जास्तीतजास्त गतीने उपचार मिळण्यासाठी प्रयत्न होत आहे. मात्र, बऱ्याच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहात नसल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २४ तास नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची सभा राजू भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, सदस्य नीता खरात, शिवांजली भोसले, जयश्री गिरी, राजेश्वरी भोसले, संध्याराणी भोसले- पाटील, शकुंतला चोरमले, प्रियांका देशमुख आदी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओपीडीच्या माध्यमातून रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत. याठिकाणी प्रसूतीचे प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक वाढावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. महिलांमध्ये झपाट्याने वाढत असलेल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर आळा घालण्यासाठी देशभरातील १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे लसीकरण करण्यात येत असल्याचे राजू भोसले यांनी केली.
आरोग्य समिती सभेत राजू भोसले यांनी आरोग्य विभागांतर्गत प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करून त्यांना त्यांच्या मूळ मुख्यालयी हजर होण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार डॉ. महेश खलिपे यांनी प्रतिनियुक्ती रद्द करण्याबाबत पत्रक काढले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात येत असून, त्यांनी तत्काळ आपल्या मूळ मुख्यालयात हजर व्हावे, असे आदेश डॉ. खलिपे यांनी दिले आहेत.

...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT