सातारा- लोणंद महामार्गाचे काम निकृष्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप; अंबवडे संमत वाघोलीत रास्ता रोको
वाठार स्टेशन, ता. २४ : सातारा- लोणंद राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या गतीने, तसेच घाईगडबडीने सुरू आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, कामात सुधारणा न झाल्यास झालेले काम उखडून टाकू, असा इशारा आज अंबवडे संमत वाघोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला.
गेल्या दोन वर्षांपासून सातारा- लोणंद राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम हैदराबाद येथील केसीपीएल या कंपनीकडे दिले आहे. मात्र, हे काम निकृष्ट झाल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस पाण्यासाठी भलीमोठे गटारे बांधण्यात आली आहेत. मात्र, हे नाले निकृष्ट असल्याने ते तुटले आहेत, या नाल्यात पडून अनेक अपघात झाले आहेत. गटारावर टाकलेला स्लॅब हा कमी जाडीचा आहे. त्यामुळे यावरून कोणतेही वाहन गेले तरी या नाल्यात अडकत आहे. याशिवाय गाव, शाळा, उद्योग- व्यवसाय ठिकाणी ही अशीच स्थिती आहे. त्यामुळे या कामाची सुधारणा व्हावी, यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कोरेगाव पंचायत समिती सदस्य नीलेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नरसिंग दिसले, नितीन लवंगारे, केशव देशमुख, नीलेश कदम, नाना भिलारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता येथील अंबवडे संमत वाघोली येथे कार्यकर्त्यांनी घोषणा देत आंदोलन केले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सुभाष घंटे, लक्ष्मण पाटील, केसीपीएलचे अजित शिंगटे यांनी ग्रामस्थांच्या आरोपांची उत्तरे दिली. मात्र, दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत या भागातील प्रमुख लोकांसोबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावावी, नंतरच काम चालू करावे, असा इशारा दिला.
--------------------------------
00329
अंबवडे संमत वाघोली : येथे ग्रामस्थांनी तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला रास्ता रोको. (अतुल वाघ : सकाळ छायाचित्रसेवा)
---------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.