पुणे

बाजारपेठेतील कचरा संकलनावर भर

CD

साताऱ्यात बाजारपेठेतील कचरा संकलनावर भर
दहा आरोग्‍य कर्मचारी सक्रिय; सोनगाव डेपोत होतेय विलगीकरण

सातारा, ता. ८ : दिवाळी म्हटलं, की खरेदीचा महोत्‍सव. बालगोपाळांची मौजमजा. अशा दिवाळीनिमित्त सर्वांचीच पावले बाजारपेठेकडे वळतात आणि खरेदी- विक्रीतून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. तो कचरा वेळच्‍यावेळी संकलित करून सातारा शहरात स्‍वच्‍छता कायम ठेवण्‍यासाठी पालिका सक्रिय झाली आहे.
सकाळी आणि रात्रीच्‍या सुमारास बाजारपेठेत दहा आरोग्‍य कर्मचारी सफाईसाठी तैनात असून, संकलित कचरा ट्रॉलीतून सोनगाव कचरा डेपोकडे पाठवण्‍यात येत आहे.
राजपथ तसेच मोती चौक ते पाचशे पाटी या मार्गावर साताऱ्याची बाजारपेठ विस्‍तारली आहे. या पेठेत साताऱ्याचे अर्थचक्र फिरत असल्‍याने येथे विविध प्रकारच्‍या दुकानांची मोठी गर्दी आहे. दिवाळीसाठी आवश्‍यक कपडे व इतर साहित्‍य खरेदी करण्‍यासाठी गेल्‍या काही दिवसांपासून येथे मोठी गर्दी होण्‍यास सुरुवात झाली आहे. दुकानदारांसह रांगोळीसह पणत्‍या व इतर साहित्‍य विकणाऱ्यांनी देखील येथे दुकाने थाटली आहेत. या सर्वच ठिकाणी खरेदीदारांची मोठी गर्दी सकाळपासून होत आहे.
दिवसभरातील व्‍यवसायानंतर जमा होणारा व्‍यावसायिक कचरा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात होत आहे. तो इतरत्र टाकला जात असल्‍याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अस्‍वच्‍छता निर्माण होत आहे. व्‍यापारी आणि ग्राहकांना होणारा हा त्रास कमी करण्‍यासाठी पालिकेच्‍या आरोग्‍य विभागाने आवश्‍यक ती सज्‍जता केली आहे. गेल्‍या पाच दिवसांपासून सकाळी तसेच रात्री ११ नंतर पालिकेचे पथक बाजारपेठेतील कचरा संकलित करत तो ट्रॉलीमधून सोनगाव कचरा डेपोकडे पाठवत आहे. या कामामुळे बाजारपेठ स्‍वच्‍छ राहण्‍यास मदत झाली आहे.
...............
राजपथ, मोती चौक ते पाचशे एक पाटी तसेच जिल्‍हा क्रीडा संकुल तसेच पोवई नाका परिसरावर सद्य:स्‍थितीत आरोग्‍य विभागाचे अधिक लक्ष आहे. याठिकाणचा कचरा संकलनासाठी दहा कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्‍यात आले असून, संकलित कचरा दोन ट्रॅक्‍टर ट्रॉलीतून विलगीकरणासाठी पाठवला जात आहे.
..............
बाजारपेठेत सध्‍या मोठी गर्दी असून, व्‍यवसायावेळी निर्माण होणारा कचरा व्‍यावसायिक व पथारी विक्रेत्‍यांनी इतरत्र न टाकता घंटागाडीत टाकणे आवश्‍यक आहे. व्‍यावसायिक तसेच नागरिकांनी पालिकेस या काळात सहकार्य करण्‍याचे आवाहन आरोग्‍य विभागाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.
.........
63501
सातारा : मोती चौक परिसरातील कचरा संकलन करताना कर्मचारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बॉस असावा तर असा! दिवाळीला प्रत्येकाला दिला १ लाखांचा बोनस, कर्मचारी भावुक; Video Viral

Mega Clean River Mission 2029 Deadline : "२०२९ आधी नदी पूर्ण स्वच्छ करूनच जनतेसमोर येणार!"; तब्बल ८,९४१ कोटींच्या मेगा प्लॅनची घोषणा, गृहमंत्र्यांचा मोठा संकल्प

Murud Accident: मुरुडवर शोककळा! भरधाव कारची स्कूटरला जोरदार धडक; शिक्षक आणि प्रसिद्ध गणेशमूर्तिकार तानाजी कुंभार यांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update: : शरद पवारांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या 'सिल्वर ओक'वर जाणार; रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भेटीची मालिका सुरू

Emotional Post by Saira Banu : "दिवाळीच्या प्रकाशात एक वेगळीच जादू असते, आमची फोटो काढण्याची होती परंपरा"; पाली हिलच्या बंगल्यातील जुन्या आठवणींना उजाळा देत चाहत्यांचेही पाणावले डोळे

SCROLL FOR NEXT