पुणे

बालरोगसाठी १३ कोटी ५० लाख रुपये निधी

CD

‘बालरोग’साठी १३ कोटी ५० लाख

साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी मंजूर

सातारा, ता. ३० ः सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे येथील मेडिकल कॉलेजच्या बालरोग चिकित्साशास्त्र विभागाकरिता यंत्रसामग्री व साधनसामग्री (टर्न की सहित) खरेदीसाठी १३ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
येथील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा मेडिकल कॉलेज व रुग्णालय लवकरात लवकर सुरू होऊन त्याचा जनसामान्यांना लाभ व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
याबद्दल मंत्री भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहेत.
सातारा मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या सर्व इमारतींचे बांधकाम पूर्ण व्हावे आणि या कॉलेज व रुग्णालयातील सर्व विभाग पूर्ण क्षमतेने सुरू व्हावेत, यासाठी मंत्री भोसले यांचा पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात ते मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत असून, त्यांच्या पाठपुराव्यातूनच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत मेडिकल कॉलेज, रुग्णालयातील बालरोग चिकित्साशास्त्र (एनआयसीयू) विभागासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री व साधनसामग्री (टर्न की सहित) खरेदीसाठी १३ कोटी ५० लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. नुकतीच यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीमधून कॉलेज, रुग्णालयातील बालरोग चिकित्साशास्त्र विभागासाठी आवश्यक यंत्रसामग्री व साधने खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सातारा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय लवकरात लवकर सुरू होऊन त्याचा लाभ सातारा जिल्ह्यातील रुग्णांना झाला पाहिजे. यासाठी हे मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय तातडीने सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठीच आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहोत, असे मंत्री भोसले यांनी नमूद केले.

-----------------------

Shendurwada News : सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश! शेंदूरवाड्यात १० केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर सुरू; शेतकऱ्यांना आता आठ तास वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा

Rafale Marine : भारतीय नौदलाच्या हवाई सामर्थ्यात भर! आयएनएस विक्रांतवर राफेल मरीनचे यशस्वी लँडिंग

Marathi News Live Updates : माजी मंत्री तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्याकडून रविराज साबळे यांना घरात घुसून जिवे मारण्याची धमकी; दिवाळी किट वाटपावरून वाद!

RO-KO ची न्यूझीलंडमध्ये जोरदार तयारी! BCCI ने विराट-रोहितचा शेअर केला खास Video; कधी सुरू होणार वनडे मालिका?

Amit Shah: संसदेत होणार 'आर-पार'ची लढाई! 'मत चोरी'च्या मुद्द्यावरुन अमित शाहांचं राहुल गांधींसह अखिलेश यादवांना आव्हान

SCROLL FOR NEXT