पुणे

केमिस्टचा मोर्चा, बंद

CD

मेडिकल व्यावसायिकांचा साताऱ्यात मूक मोर्चा

ऑनलाइन औषध विक्रीचा विरोध; बंदमध्ये साडेतीन हजारांवर मेडिकलधारकांचा सहभाग

सातारा, ता. २० : ऑनलाइन औषध विक्रीच्या निषेधार्थ व विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या आजच्या संपात सहभागी होत ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट, सातारा तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढला, तसेच जिल्हा प्रशासनास मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सर्वांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. या बंदमध्ये जिल्ह्यातील तीन हजार २५० मेडिकल विक्रेते सहभागी झाले होते.

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद देत ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट, तसेच सातारा तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असाेसिएशन संपात सहभागी होत प्रतिसाद दिला. यावेळी असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला, तसेच जिल्हा प्रशासनास आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. ऑनलाइन औषध विक्री बंद करा, कार्पोरेटद्वारे अव्यावसायिक डिस्काऊंट बंद करा, बनावट औषधीपासून देश वाचवा, असे संदेश दिलेले फलक घेऊन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढला. या मूक मोर्चात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्टचे जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा बंद पुकारण्यात आला होता. यावेळी सातारा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील, मनोज मारडा, उपाध्यक्ष महेश साळुंखे, सचिव महेंद्र कदम, कोषाध्यक्ष रणजित मोहिते, प्रशांत साळुंखे यांच्यासह पदाधिकारी व मेडिकल व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांसाठी सातारा शहरातील चार ठिकाणी औषधे उपलब्धता ठेवण्यात आली होती. या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास बेमुदत बंद आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
.......................................
20589
सातारा : सातारा केमिस्ट व ड्रगिस्ट असाेसिएशनने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मूक मोर्चा. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा)
.................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT