मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर
साताऱ्यात पोलिस संचलन
सातारा, ता. २४ : मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरासह परिसरात शहर पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. याद्वारे पोलिसांनी शस्त्र सज्जतेचे आणि सतर्कतेचे दर्शन सातारकरांना घडवले.
शहर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळी संचालनासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकत्रित केले. त्यानंतर ७ अधिकारी, ८५ अंमलदार, हवालदार, तसेच १०० गृहरक्षक दलाचे जवान, पोलिस दलातील वाहनांसह हे पथ संचलन करण्यात आले. पाचशे एक पाटी, बारटक्के चौक, मोती चौक, देवी चौकमार्गे तालीम संघ आणि पुन्हा शहर पोलिस ठाण्यापर्यंत हे संचलन काढण्यात आले. यादरम्यान पोलिस दलाची सज्जतेची झलक सातारकरांना पाहावयास मिळाली.
..........
29536
सातारा : शहरात बुधवारी पोलिसांनी संचलन केले. यावेळी सहभागी झालेले पोलिस कर्मचारी. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा)
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.