सातारा पोलिस दलातील
४६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती
जिल्ह्यात २४ जण उपनिरीक्षकपदी
सातारा, ता. ३१ : जिल्हा पोलिस दलातील ४६ पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये २४ सहायक पोलिस उपनिरीक्षकांना पोलिस उपनिरीक्षकपदी, ११ पोलिस हवालदारांना सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी, तर ११ पोलिस नाईक व शिपाई यांना हवालदारपदी पदोन्नती मिळाली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी ही पदोन्नती प्रक्रिया पूर्ण केली. पदोन्नती झालेल्यांमध्ये श्रेणी पोलिस उपनिरीक्षकपदी अफसर इनामदार, प्रकाश माने, आनंदराव भोईटे, नंदकुमार घाटगे, रविकांत ढाणे, महेश कदम, दीपक जाधव, मनोहर सुर्वे, हिमेश माने, संजय साबळे, संजय जाधव, सुनील गायकवाड, तानाजी घोरपडे, प्रकाश कदम, महेश कमाने, रवींद्र कदम, प्रवीण शिंदे, उज्वला कुंभार, कांतीलाल नवघणे, जनार्दन खंडाळे, संजय चव्हाण, संजय मदने, दीपक बर्गे आणि संजय सपकाळ यांचा समावेश आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी संतोष शिंदे, आनंदा कदम, दत्तात्रय लोखंडे, काकासाहेब पाटील, प्रतिभा कर्पे, रियाज शेख, सचिन देशमुख, महादेव घाडगे, प्रवीण चव्हाण, मल्हारी भिसे आणि दादासो यादव यांना पदोन्नती मिळाली आहे, तसेच पोलिस हवालदारपदी संदीप जाधव, हेमंतकुमार ढाणे, संदीप इंगळे, ज्ञानेश्वर टिंगरे, राकेश घाडगे, अनिलकुमार खाडे, सागर रासकर, संदीप फणसे, सुधीर वाघमारे, बाळकृष्ण नष्टे आणि दत्तात्रय धायगुडे यांची पदोन्नती झाली आहे. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि पोलिस उपअधीक्षक (गृह) कृष्णकुमार जाधव यांनी पदोन्नतीप्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
..................................................