पुणे

नालेसफाईवेळी निघतोय कचऱ्याचा ढिग

CD

गटारांत प्लॅस्टिक बाटल्या अन् राडारोडा

साताऱ्यात नालेसफाईत कचऱ्याचा ढीग; कर्मचाऱ्यांची दमछाक


सातारा, ता. १५ : शहरासह परिसरातील ओढे- नाल्‍यांची सफाई पालिकेकडून सध्या सुरू आहे. या सफाईवेळी ओढे- नाल्‍यातून कचऱ्याचे ढीग निघत असून, त्‍यात प्‍लॅस्‍टिकच्‍या बाटल्‍यांचे प्रमाण अधिक आहे. या बाटल्‍या, अन्य राडारोडा हटवताना आरोग्‍य कर्मचारी घामाघूम होत आहेत. गेल्‍या आठ दिवसांपासून सुरू असणाऱ्या या सफाई मोहिमेदरम्‍यान आत्तापर्यंत सुमारे सव्‍वाशे टन कचरा, राडारोडा काढत सोनगाव कचरा डेपोत पालिकेकडून त्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यात येत आहे.

अजिंक्‍यतारा, यवतेश्‍वर तसेच पेढ्याचा भैरोबाच्‍या डोंगर उतारावर सातारा शहर वसले आहे. येथील लोकवस्‍तीतील सांडपाणी वाहून नेण्‍याचे काम पूर्वीपासून डोंगररांगात उगम पावलेले ओढे करतात, तसेच पालिकेच्‍या वतीने नाल्‍यांची व्‍यवस्‍था देखील करण्‍यात आली आहे. शहर आणि परिसरातील अशा गटारांची लांबी सुमारे शंभर किलोमीटरच्या दरम्यान आहे. दरवर्षी पावसाळापूर्व ओढे, नाल्‍यांची सफाई पालिकेच्‍या वतीने केली जाते. यंदाही अशीच मोहीम सुरू असून, यात गाळ, राडारोडा आणि कचरा हटविण्‍याचे काम सुरू आहे. या कामादरम्‍यान प्‍लॅस्‍टिकच्‍या बाटल्‍यांचा ढीग गटारे-ओढ्यातून बाहेर निघत आहे. त्‍या बाटल्‍या हटवताना आरोग्‍य कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे.
............

यामुळे तुंबतात गटारे...

गटारांच्‍या सफाईदरम्‍यान पाण्‍याच्‍या तसेच शीतपेयांच्या बाटल्‍या जास्‍तीच्‍या निघत आहेत. नागरिक पाणी, शीतपेय पिल्‍यानंतर रिकाम्‍या बाटल्‍या गटारात टाकत असल्‍याने गटारे तुंबण्‍याच्‍या प्रमाणात वाढ होत आहे.
.............
सव्वाशे टन कचरा, राडारोडा...


सफाईदरम्‍यान रोज आठ ते दहा डंपर कचरा, राडारोडा गटार- ओढ्यातून काढण्‍यात येत आहे. आत्तापर्यंत सुमारे सव्‍वाशे टन वजनाहून अधिक राडारोडा डेपोत नेला. सफाईच्‍या कामासाठी दोन डंपर, ट्रॅक्‍टर, जेसीबी तसेच पोकलेन आणि ५० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
............


नागरिकांनो, हे करा...
ओढे-नाल्‍यात कचरा फेकणे टाळा.
बंदिस्‍त गटारांत राडारोडा टाकू नका.
प्‍लॅस्‍टिक बाटल्‍यांची व्‍यवस्‍थित विल्‍हेवाट लावा.
बांधकाम साहित्‍य गटाराकडेला ठेवू नका.
गटाराच्‍या चेंबरमधून आत कचरा टाकू नका.
.......................


W19304
एआय निर्मित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada: लॉटरीची घरे घटणार? २० टक्के योजनेतील घरांवरून म्हाडा-पालिका पेच

Young Age Lifestyle Diseases: तिशीतच वाढतोय डायबेटीस-BPचा धोका! तरुणांच्या मेटाबॉलिक हेल्थमध्ये नेमकं काय बिघडतंय?

IND vs SL, 2nd Test: श्रीलंकेकडून फाईटबॅक! सोनल दिनूशाची शतकाकडे वाटचाल; भारत फॉलोऑन देणार?

Driving License: RTO मध्ये न जाता घरबसल्या बदला ड्रायव्हिंग लायसेन्सवरील पत्ता! जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Nitin Gadkari Clarification : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्ती घेणार? कार्यालयाकडून अखेर मोठं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT