पुणे

बुधवारपासून शारदीय व्याख्यानमाला

CD

साताऱ्यात बुधवारपासून
शारदीय व्याख्यानमाला
सातारा, ता. १७ ः श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयाच्या वतीने येत्या बुधवारपासून (कै.) ल. ना. तथा दादा वाडीकर स्मृतिप्रीत्यर्थ शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
बुधवारी (ता. २१) लोकलयीतील कविता लोकसंस्कृतीचा आविष्कार या विषयावर सुपे (बारामती) येथील कवी हनुमंत चांदगुडे यांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेस प्रारंभ होणार आहे. गुरुवारी (ता. २२) हटके सोचो या विषयावर येथील दीपक कुलकर्णी यांचे, तर शुक्रवारी (ता. २३) आकाशवाणीचे दिवस या विषयावर सातारा आकाशवाणीचे निवृत्त सहायक संचालक सचिन प्रभुणे यांची मुलाखत संवादक ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे घेणार आहेत. शनिवारी (ता. २४) आहुर्तीनी सिद्ध केला. मंत्र वंदे मातरम्! या विषयावर कऱ्हाड येथील राजेंद्र अलोणे यांचे व्याख्यान होणार आहे. रविवारी (ता. २५) स्वरयात्रा मराठी हिंदी गीतांचा आविष्कार हा कार्यक्रम पुणे येथील श्रेयस तेजस रानडे आणि सहकारी सादर करणार आहेत. ही व्याख्याने दररोज सायंकाळी सहा वाजता वाचनालयाच्या पाठक हॉल येथे होणार आहेत. या व्याख्यानांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष अमित कुलकर्णी, उपाध्यक्ष सीए अतुल दोशी, विश्वस्त अनंतराव जोशी यांनी केले आहे.

...................चिंचकर.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Pune News : झाडणकाम वाढले, रस्ते स्वच्छ, उकिरडे झाले कमी

Rapido Crime : बेकायदा प्रवासी वाहतूकप्रकरणी ‘रॅपिडो’वर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT