पुणे

रस्त्यावर नशा

CD

नशेखोरी, पार्ट्या अन्‌ हुल्लडबाजी

सदरबझारमधील नागरिक त्रस्त; रात्री फिरणेही मुश्कील

सातारा, ता. २० : शहरातील सदरबझारमधील सुमित्राराजे उद्यान, तसेच आरटीओ परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर आता उघडपणे नशेखोरी, रंगीत -संगीत पार्ट्या आणि तरुणांच्‍या टोळक्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी हुल्लडबाजीचे प्रमाण जास्‍त असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारांमुळे अनेकदा रात्रीच्या वेळी कुटुंबांसह फिरणेही धोकादायक झाल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
सिंबायोसिस रुग्णालय परिसर शहरातील शांत आणि कमी वर्दळीचा आहे. या ठिकाणी रुग्णालयांची संख्याही अधिक आहे. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याच्या अंतर्गत रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत अनोळखी व्यक्तींची गर्दी होत असते. मद्यप्राशन, अमली पदार्थांचे सेवन, तसेच अश्लील आणि आक्षेपार्ह वर्तनाचे प्रकार या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या टोळक्यांकडून होत असतात. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांत असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
विशेष म्हणजे, परिसरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर अद्याप पुरेशी पथदिव्यांची व्यवस्था नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी अंधार असतो. त्याचा फायदा घेत हे प्रकार खुलेआम सुरू असल्याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे. रात्रीच्या वेळी येथील अंधारामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला पोषक वातावरण निर्माण होत असल्‍याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
......
चौकट
.......

रात्रगस्तीची मागणी...

अनेकदा युवकांकडून रस्त्यावर गाड्या आडव्या लावल्या जातात. रस्त्यावरच वाढदिवस साजरे केले जातात. रात्रीचे फटाके उडवणे, आरडाओरडा करण्याचा प्रकार होतो. दहशतीमुळे या युवकांना स्‍थानिक नागरिक हटकण्‍याचे धाडस करत नाहीत. या परिसरात नियमित पोलिस गस्त घालण्‍याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT