पुणे

बसस्थानक

CD

लांब पल्ल्याच्या गाड्या
स्थानकासमोरून सुटणार

जिल्ह्यांतर्गत एसटीसाठी आवारात तात्पुरते फलाट; प्रवाशांना सुविधा देणार

सातारा, ता. १४ : शहरातील मुख्य बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने तात्पुरती पर्यायी व्यवस्था उभारली आहे. जिल्ह्यांतर्गत धावणाऱ्या एसटी बससाठी मुख्य बस स्थानकाच्या आवारात तात्पुरते फलाट उभारण्यात आले आहेत. मात्र, लांब पल्याच्या बसची संख्या मोठी असल्याने जागेची कमतरता भासत आहे. त्यामुळे बस स्थानकाचे काम सुरू होण्यापूर्वी लांब पल्याच्या एसटी बस प्रशासकीय इमारतीच्या मैदानावरून सोडण्यात येणार आहेत.
बस स्थानक आवारात प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. तात्पुरते कंट्रोल केबिन, तिकीट व्यवस्था, बस वेळापत्रक फलक, पिण्याचे पाणी, बसथांब्यासाठी शेड, तसेच स्वच्छतागृहांची सुविधा उभारणी केली आहे. बस स्थानकाच्या पुनर्बांधणीदरम्यान प्रवाशांना सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी वाहतूक नियोजनालाही प्राधान्य दिले जात आहे. सद्यःस्थितीत बस स्थानक आवारात सोई सुविधांसाठी फलाट उभारून त्याच ठिकाणावरून बस सोडल्या जात आहेत; परंतु बस स्थानकाचे काम सुरू झाल्यानंतर अडचण होणार आहे. त्यामुळे लांब पल्याच्या गाड्या प्रशासकीय इमारतीजवळील मैदानातून सोडल्या जाणार आहेत.

...........
चौकट

जादा फलाटांची उभारणी होणार
-----------
सध्या मुख्य बस स्थानकात एका बाजूला फलाटाची उभारणी केली आहे. या ठिकाणी तिकीट आरक्षण, अधिकारी केबीन यासह काही कार्यालये सुरू केली आहेत. मात्र, प्रवाशांची संख्या अधिक असल्याने फलाटांची संख्या कमी पडत असल्याने गैरसोय होत आहे. भर उन्हात प्रवाशांना आडोसा नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रवाशांची गैरसोय टळण्यासाठी फलाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
...................
कोट

बस स्थानकाचे काम लवकरच सुरू होणार आहे. सध्या फलाटांची उभारणी झाली असून, त्याच ठिकाणावरून फेऱ्या सोडल्या जात आहेत. बस स्थानकाचे काम सुरू झाल्यानंतर जिल्ह्याबाहेरील फेऱ्या प्रशासकीय इमारतीजवळ सुरू केल्या जाणार आहेत.

- स्वाती बोंद्रे , डेपो मॅनेजर, सातारा
.............
- PNE26W18492
सातारा : मध्यवर्ती बस स्थानकात उभारलेले तात्पुरते फलाट. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा)
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT