पुणे

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करा

CD

‘शाॅर्टकट’मुळे वाहनधारकांचा जीव टांगणीला

साताऱ्यात बसस्थानक परिसरात उलट्या दिशेने प्रवास धोक्याचा

सातारा, ता. १८ : शहरातील बस स्थानक परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होऊन वाढलेले अपघात रोखण्यासाठी बस स्थानकाबाहेरील रस्ता दुभाजक बंद करून वाहतुकीत बदलाचा निर्णय झाला होता, तरीही काही वाहनचालक शॉर्टकटसाठी शाहू स्टेडियम व बस स्थानकात येण्यासाठी नो एंन्ट्रीत येत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अपघाताची भीती असून, अशा बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे.
मुख्य बस्थानकाबाहेर रस्ता दुभाजकातून बस व खासगी वाहने स्थानकात येत असल्याने परिसराला बेशिस्तीचे ग्रहण लागत होते. त्यामुळे या परिसरातील कोंडी काही प्रमाणात कमी करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून बसस्थानकात येणाऱ्या बस भूविकास चौकातून पुन्हा वळण घेऊन बसस्थानकात येणारी वाहतूक सुरू केली. सुरुवातीला चारचाकीसह दुचाकी वाहने नियम पाळून भूविकास चौकातून येत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शाहू स्टेडियम व बसस्थानकात येणाऱ्या दुचाकी उलट्या दिशेने येत आहेत. या प्रकारामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: चक दे इंडिया! भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; हॉकीचं सुवर्णपदक आता एक विजय दूर...

Hingoli Court : चोर कोर्टात तारखेसाठी आले अन् इन्व्हर्टर, बॅटरीच पळवली; हिंगोलीत चोरट्यांचा प्रताप, काय आहे प्रकरण?

Ration Card: 'त्या' शिधापत्रिका निष्क्रिय होणार, सहा महिने धान्याची उचल नसल्यास सरकार घेणार मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : 'काळजी करु नका, न्याय मिळवून देऊ'; उद्धव ठाकरेंकडून प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांना ग्वाही

Shrigonda News: विवाहितेसह २२ वर्षीय तरुणाने एकत्रच संपवलं आयुष्य; नगरमधील घटनेनं खळबळ; पोलीस तपास सुरू

SCROLL FOR NEXT