सातारा महिला शेतकऱ्यांना
आता स्वतंत्र ओळख
प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू
ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : राज्यातील शेती क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या महिला शेतकऱ्यांना आता अधिकृत ओळख मिळणार असून, त्यांच्यासाठी ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत हे विशेष प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महिलांना विविध शासकीय योजना, कृषी पतकर्ज, पीकविमा, कृषी निविष्ठा आणि विस्तार सेवांचा लाभ थेट व अधिक सुलभतेने मिळण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.
शेतीमध्ये प्रत्यक्ष राबणाऱ्या महिलांच्या नावावर अनेकदा जमिनीची स्वतंत्र मालकी नसल्याने किंवा अधिकृत नोंदीअभावी त्यांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र महिला शेतकऱ्यांनी पोर्टलवरील लिंकद्वारे आपले अर्ज वेळेत सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
अर्जासंदर्भात कोणतीही तांत्रिक अडचण किंवा अधिक माहिती हवी असल्यास महिलांनी आपल्या भागातील नजीकचे सहाय्यक कृषी अधिकारी अथवा उप कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही श्रीमती फरांदे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.