टुडे एकसाठी
फरार आरोपी भालेकर अटकेत
पारनेर, ता. २३ : मारहाण व लुटमारीच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सतीश भालेकर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, म्हसणे फाटा एमआयडीसी परिसरातील सिलॉन बेव्हरेज कॅन कंपनीच्या विभागप्रमुखांवर हल्ला करून त्यांची सोन्याची चेन हिसकावून घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो फरार होता. भालेकर हा नीलेश लंके प्रतिष्ठानचा पारनेर तालुकाध्यक्ष आहे.
या प्रकरणात काही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र भालेकर फरार असल्याने त्यांचा शोध सुरू होता. अखेर एलसीबीच्या पथकाने त्यास पुण्यातून ताब्यात घेतले.
दरम्यान भालेकर यास आज (ता.२३) पारनेर न्यायालयात हजर केले असता, पारनेर न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सुपे पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.