शनिवार वीर मारुती मंडळातर्फे
विविध सामाजिक उपक्रम
शिवाजीनगर, ता. ५ ः शनिवार वीर मारुती मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे माजी अध्यक्ष संदीपभाऊ मोहळ यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त हे कार्यक्रम घेण्यात आले.
रक्ताची निर्मिती कृत्रिमरीत्या करता येत नाही, त्यामुळे केवळ रक्तदानाद्वारेच तुटवडा दूर होऊ शकतो, या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत ७५ जणांनी या शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले. हडपसरमधील अभय रक्त संकलन केंद्राने सहकार्य केले. याप्रसंगी रक्तदात्यांना मंडळातर्फे प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
तसेच अयोध्या चॅरिटेबल ट्रस्टच्या कर्णबधिर मुलांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसह अन्न-धान्याचे किट व साफ-सफाईचे साहित्य वाटप करण्यात आले. याबरोबरच जांभूळवाडीतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर गोशाळेतील गुरांना चारा उपलब्ध करून देण्यात आला
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शंकरराव मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कामगार सेलचे प्रदेश सरचिटणीस सोमनाथ शिंदे, नितीन पोटे, आदित्य करपे, मयूर गोगावले, श्रेयस कुंजीर, दीपक करपे, रोहित धावडे, अक्षय घोडके, पै. श्याम शिंदे, अजिंक्य करपे, दीपूल इनामदार, गौरव देशपांडे, आदींसह मंडळाच्या सभासदांनी परिश्रम घेतले.
------------------------------
वानवडी ः अयोध्या चॅरिटेबल ट्रस्टच्या कर्णबधिर मुलांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या, याप्रसंगी शनिवार वीर मारुती मित्र मंडळाचे पदाधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.