Ankita-Patil 
पुणे

सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील

डॉ. संदेश शहा

इंदापूर - सत्यजित तांबे यांनी स्वतःची कुवत लक्षात घेऊन लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. त्यांचे संधीसाधू राजकारण हे तर संपूर्ण राज्याला माहित आहे. त्यामुळे आपण ज्येष्ठ नेत्याबद्दल दिशाभूल करणारी वक्तव्ये करु नयेत, असा पलटवार पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी केला.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी इंदापूर येथील युवक मेळाव्यातहर्षवर्धन पाटील यांच्या बद्दल टीकाटिप्पणी केली होती. त्यामुळे अंकिता पाटील यांनी तांबे यांच्यावर टीका केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंकिता पाटील पुढे म्हणाल्या, तांबे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना मोठे सहकार्य केले, त्याची जाणीव  तांबे यांनी ठेवणे आवश्यक होते.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकाटिप्पणीकरण्या पूर्वी त्यांच्या राजकीय कार्यकीर्दीएवढे देखील आपले वय नाही याची जाणीव सत्यजित तांबे यांनी ठेवायला हवी होती.

राज्यातील ज्येष्ठ नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात बोलताना सत्यजित तांबे यांनी राजकीय संकेत बाळगणे आवश्यक होते. मोठ्या नेत्यावर बोलले म्हणजे आपण मोठे होत नाही, त्याला कामच करावे लागते असा टोला शेवटी अंकिता पाटील यांनी तांबे यांना शेवटी लगावला.
अंकिता पाटील.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT