पुणे, ता. ५ : गर्भाशयमुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधात्मक असलेल्या व सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेल्या ‘सर्व्हावॅक’ या ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) प्रतिबंधक लशीला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पूर्व-पात्रता प्रदान केली आहे. ही लस पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असून, स्त्री-पुरुष दोघांसाठी विकसित केलेली भारतातील पहिलीच लस आहे.
भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) यापूर्वीच या लशीला देशांतर्गत वापरासाठी मंजुरी दिली आहे. ही लस महिलांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग, योनीमार्ग आणि गुदद्वाराचा कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त आहे, तसेच पुरुषांमध्ये गुदद्वाराचा कर्करोग आणि जननेंद्रियावरील चामखीळ (जेनिटल वॉट्स) रोखण्यासाठी ही प्रभावी ठरते. ही लस प्रामुख्याने एचपीव्ही प्रकार ६, ११, १६ आणि १८ या विषाणूंवर प्रभावी ठरते. ९ ते २६ वयोगटातील मुले आणि मुली अशा दोघांसाठीही लशीचा वापर करता येणार आहे. ९ ते १४ वयोगटातील मुलांसाठी दोन डोस (० आणि ६ महिने), तर १५ ते २६ वयोगटातील व्यक्तींसाठी तीन डोस (०, २ आणि ६ महिने) अशी लशीची मात्रा आहे.
या संदर्भात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले, ‘‘‘सर्व्हावॅक’ला मिळालेली मान्यता ‘एचपीव्ही’विरोधातील जागतिक लढ्याला बळ देणारे महत्त्वाचे पाऊल आहे. या निर्णयामुळे संयुक्त राष्ट्रांच्या विविध संस्थांना जागतिक स्तरावर लसीकरण मोहिमेसाठी पुरवठा करणे शक्य होईल. हडपसर आणि मांजरीतील प्रकल्पांतून वर्षाला ४०० कोटी डोस तयार करण्याची क्षमता आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.