पुणे

वाईत २५ मे पासून चार दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला.

CD

वाईत सोमवारपासून
सावरकर व्याख्यानमाला

वाई, ता. १९ : स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, वाई आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला यावर्षी २५ ते २८ मे या कालावधीत होणार आहे. यंदाचे हे ३६ वे वर्ष आहे.
सोमवारी (ता. २५) जन्मदा प्रतिष्ठान, पुणे निर्मित : ‘वंदे मातरम १५०’ कार्यक्रम होणार आहे. यामध्ये लेखक : मिलिंद सबनीस, दिग्दर्शक : प्रसाद कुलकर्णी, संगीत : अजय पराड, दृश्य संकलन : महेश लिमये यांचा असून, सहभाग : अभिषेक खेडकर, चारूलता पाटणकर, प्रदीप फाटक यांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्रसाद सुर्वे आणि  अविनाश जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
मंगळवारी (ता. २६) सुनील संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली वक्ते विक्रम एडके, पुणे यांचे ‘मस्तानी पल्याडचे बाजीराव’ या विषयावर, बुधवारी (ता. २७)  संघ शताब्दीनिमित्त कन्याशाळा, वाईच्या  अध्यक्षा उमा जोशी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख वक्त्या मृणालिनी चितळे, पुणे या ‘हुतात्मा राजगुरू’ विषयावर, तर गुरुवारी (ता. २८) स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनी मेजर डॉ. समीर पवार यांच्या अध्यक्षतेखाली वक्ते माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, पुणे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे आजचे औचित्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमाला दररोज सायंकाळी सात वाजता  कन्या शाळेच्या (कै.) सत्यवती जोशी सभागृहात होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश शेंडे यांनी दिली.
---------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT