पुणे

ऐतिहासिक वारशाला अतिक्रमणाचे गालबोट

CD

चाकण, ता. २० : येथील भुईकोट, संग्रामदुर्ग किल्ला  अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. किल्ल्याच्या डागडुजीचे काम सध्या सुरू असले तरी खंदक गाडले गेलेले आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवर, बुरुजावर झाडे-झुडपे वाढलेली आहेत. इतर लोकांनी अतिक्रमणे केलेली आहेत ही अतिक्रमणे पुरातत्त्व विभाग का काढत नाही? असा प्रश्‍न इतिहास प्रेमींचा आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा धोक्यात आला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथील भुईकोट संग्रामदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी वास्तव्य केले होते असे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे किल्ल्याला ऐतिहासिक वारसा आहे. भुईकोट संग्रामदुर्ग किल्ल्यावर अनधिकृत बांधकामांमुळे धोक्यात आला आहे. स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींनी प्रशासनाने किल्ल्याच्या परिसराची मोजणी करून किल्ल्याचे क्षेत्र संरक्षित करावे आणि अतिक्रमण काढावे अशी मागणी होत आहे.
पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष
या किल्ल्याभोवतीची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार, खंदक आजही त्याच्या वैभवाची साक्ष देतात. मात्र गेल्या काही वर्षांत किल्ल्याच्या परिसरात काही लोकांनी अतिक्रमणे केली आहेत. किल्ल्याच्या परिसरात कचरा टाकणे, खंदक गाडणे तसेच दगडांची तोडफोड करून दगडांच्या चोऱ्या करणे, पांढऱ्या मातीची चोरी करणे अशा प्रकारांमुळे ऐतिहासिक वास्तूचे नुकसान होत आहे. पुरातत्त्व विभागाने किल्ल्याच्या मध्यवर्ती भागातून जाणारा रस्ता बंद करण्याचे नियोजन केले असले तरी अतिक्रमण हटविण्याबाबत निर्णायक पावले उचलली नाहीत अशी खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.

अशी आहे समस्या
- अतिक्रमण न काढणे, खंदक खुले न करणे, किल्ल्याच्या तटबंदीवरील झाडे न काढल्याने किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात
- किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूच्या जागेतील पोलिस वसाहत अडगळीत
- किल्ल्याचा उत्तरेकडील दरवाजा परिसरात अतिक्रमण
- किल्ल्याच्या पंचवीस मीटरच्या आतही झाली बांधकाम

संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या मध्यभागातून जो रस्ता जातो त्या रस्त्याच्या खाली काही वाडे आहेत त्याचे उत्खनन होणार आहे. किल्ल्यात नव्याने अंतर्गत परिसरात वाडे, उद्यान, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आणि इतर कामे होणार आहेत. त्यामुळे किल्ल्याचे जतन दुरुस्ती व संवर्धन होणार आहे. या किल्ल्याचा ब्रिटिश कालीन नकाशा १८१८ मधील आहे तोही उपलब्ध आहे. या किल्ल्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
- विलास वाहणे, सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग

छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य लाभलेल्या या किल्ल्याचे जतन आणि संवर्धन झाले पाहिजे. सुमारे तीस कोटी रुपये खर्चाची कामे किल्ल्यात होत आहेत. किल्ल्यात उत्खनन करण्यात आले आहे. किल्ल्यात काही लोक सांडपाणीही सोडत आहेत.
- ॲड. किरण झिंजुरके, अध्यक्ष, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT