पुणे

राज्यभरात २२ ऑक्टोबरपासून ‘खेत बचाओ अभियान’

CD

राज्यभरात २२ ऑक्टोबरपासून
‘खेत बचाओ अभियान’

मृदा आरोग्य, संतुलित खत वापर, जलसंधारण आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : जमिनीचे आरोग्य सुधारणे, रासायनिक खतांचा संतुलित वापर वाढविणे, जलसंधारणाला चालना देणे आणि नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशभरात ‘खेत बचाओ अभियान’ राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून, त्यासाठी कृषी आयुक्तालयाने विभागीय आणि जिल्हास्तरावरील कार्यालयांना सूचना दिल्या आहेत.
या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीक विविधीकरण आणि पीक अवशेष व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषी विद्यापीठांच्या समन्वयातून विविध उपक्रम राबविण्यात येतील.
अभियानाच्या कालावधीत शेतकरी मेळावे, प्रशिक्षण कार्यक्रम, प्रक्षेत्र भेटी आणि शेतावरील प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे. माती परीक्षणानुसार खतांचा वापर, मृदा आरोग्य पत्रिकेचा उपयोग, खतांचा संतुलित वापर आणि खत विक्री नियमांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि कीटकनाशकांचा योग्य वापर यांवरही भर दिला जाणार आहे.
तेलबिया, कडधान्ये आणि फलोत्पादन पिकांच्या माध्यमातून पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच भात काढणीनंतर पडीक राहणाऱ्या जमिनीचा कार्यक्षम वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल. पीक अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास प्रोत्साहन देऊन पराटी आणि पेंढा जाळण्यापासून शेतकऱ्यांना परावृत्त करण्यात येणार आहे. सेंद्रिय व नैसर्गिक निविष्ठांचा वापर, नैसर्गिक शेती पद्धती आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठीही विविध उपक्रम राबविले जातील.
जलसंधारण, पाण्याचे पुनर्भरण आणि साठवणूक यांबाबत जनजागृती करण्यासह ‘प्रति थेंब अधिक पीक’ या संकल्पनेतून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकरी ओळखपत्र तयार करणे व अद्ययावत करणे, तसेच प्रधानमंत्री पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जातील.

‘शाश्‍वत पद्धतींचा अवलंब करा’

हे अभियान केवळ शासकीय कार्यक्रम न राहता लोकचळवळ व्हावी, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माहूर गडावरून परतताना भीषण अपघात! १०० फूट खोल दरीत टेम्पो कोसळला; यवतमाळच्या ३ भाविकांचा दुर्दैवी अंत

Tukaram Mundhe MPSC News : एमपीएससी पेपरफुटी चौकशी समितीच्या सचिवपदाचे तुकाराम मुंढेंना अधिकृत आदेशच मिळाले नाहीत; मुंढे नेमकं काय म्हणाले?

Gold Investment: दसरा-दिवाळीआधी गोल्ड ETF गुंतवणुकीवर ब्रेक! जुन्या SIP चं काय होणार?

Marathi News Live Updates: ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी यांची रविवारी नेर्लेत जाहीर सभा!

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाईच्या दरबारात भाविकांचा महापूर; 90 हजारहून अधिक जणांनी घेतलं दर्शन, तिरुपतीहून आलेला मानाचा शालू आज देवीला अर्पण होणार

SCROLL FOR NEXT