Pune University
Pune University Sakal media
पुणे

पुणे : विद्यापीठाचा सोमवारी पदवीप्रदान सोहळा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (Savitribai Phule Pune University) ११९ वा पदवी प्रदान सोहळा (Degree completion ceremony) येत्या सोमवारी (ता.१३) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat sing koshyari) राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता विद्यापीठातील ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचे वाणिज्य दूत (काऊंसलेट जनरल) पीटर ट्रसवेल (peter truswell) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार आहेत.

या सोहळ्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० या वर्षात आणि त्यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील एकूण तीन हजार ८०६  विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. त्यापैकी ४३ पीएच.डी धारक विद्यार्थी आहेत, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली. या वर्षातील हा दुसरा पदवी प्रदान समारंभ सोमवारी होत आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर हा पदवी प्रदान समारंभ मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी विद्यापीठात हजर राहण्याची आवश्यकता नाही. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या समारंभाचे प्रक्षेपण केले जाईल, असेही डॉ. काकडे यांनी स्पष्ट केले.

पदवीदान समारंभ पाहण्यासाठी लिंक :

http://webcast.unipune.ac.in

पदवी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या :

अभ्यासक्रम : विद्यार्थ्यांची संख्या

पदविका : ४३

पदवी : २,८६२

एम.फिल : ६

पदव्युत्तर पदविका : ४

पीएच.डी. : ४३

पदव्युत्तर पदवी : ८४८

एकूण : ३,८०६

विद्यार्थी संघटनांची नाराजी

विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा केवळ अवघ्या दोन दिवसांचा कालावधी राहिला असताना अचानकपणे शनिवारी जाहीर करण्यात आला. त्याबाबत विद्यार्थ्यांना किमान काही दिवस अगोदर माहिती न दिल्याने विद्यार्थी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर काही विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत, असे असताना पदवी प्रमाणपत्र मिळणार कसे?, पदवी प्रदान सोहळ्याबाबत विद्यापीठाने काही दिवस आधी परिपत्रक का काढले नाही?, असे प्रश्न विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

SCROLL FOR NEXT