पुणे

जागतिक क्रमवारीमध्ये विद्यापीठाचे स्थान उंचावले

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘ऑक्‍सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशी ख्याती असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक स्तरावरील मूल्याकंनात पहिल्या पाचशे एक ते सहाशे विद्यापीठांच्या क्रमवारीत स्थान मिळवले आहे. शैक्षणिक संस्थांचे जागतिक स्तरावर मूल्यांकन करणाऱ्या टाइम्स हायर एज्युकेशन या संस्थेने शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात पुणे विद्यापीठाने देशात संयुक्तरीत्या सहावा क्रमांक पटकाविला असून, पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पुणे विद्यापीठ वगळता देशातील एकाही विद्यापीठाचा जागतिक स्तरावरील पहिल्या सहाशेपर्यंतच्या क्रमवारीत समावेश झालेला नाही. ‘टाइम्स’ संस्थेकडून दरवर्षी जगभरातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करून मानांकन जाहीर केले जाते. 

विद्यापीठ २०१६ पासून ‘टाइम्स’च्या जागतिक क्रमवारीत सहभागी होत आहे. गेली तीन वर्ष विद्यापीठ ६०० ते ८०० या क्रमवारीत होते. यंदा विद्यापीठाने महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. 
- डॉ. नितीन करमळकर,  कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 500 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ विरोधात कोल्हापुरात विराट मोर्चा; सतेज पाटील, राजू शेट्टी करणार नेतृत्व

London Wari: सातासमुद्रापार पोहोचली विठ्ठलभक्ती! लंडनहून निघाली पंढरीची वारी; प्रथमच लंडन ते पंढरपूर ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’

Nagpur: महागाई, गुन्हेगारीविरोधात ‘रास्ता रोको’; विदर्भवाद्यांचा एल्गार; पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट, १७ ताब्यात

Suryakumar Yadav: श्रेयसकडे कॅप्टन्सी जाताच सूर्यकुमार यादवचं रौद्ररूप; फक्त ३६ चेंडूंत उडवला धुरळा, वाचा नेमकं काय घडलं"

SCROLL FOR NEXT