pune  Sakal
पुणे

ईएमआरसी' चा माहितीपट देशात दुसरा

विज्ञान चित्रपट महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बाजी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘विज्ञान प्रसार ’(Dissemination of science) च्या वतीने आयोजित विज्ञान चित्रपट महोत्सवात (At the Science Film Festival) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने(Savitribai Phule Pune University) बाजी मारली आहे. विद्यापीठातील शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (इएमआरसी) निर्मिलेल्या ‘कमला- द स्वदेसी न्यूट्रीइंडियन (Kamala- The Indigenous Nutriindia) या माहितीपटाला देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. १३ व १४ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे ऑनलाइन पद्धतीने ही स्पर्धा पार पडली.

ईएमआरसीने महिला शास्त्रज्ञ डॉ. कमला सोहोनी यांच्या कार्यावर माहितीपट तयार केला. डॉ. सोहोनी या विज्ञान विषयात केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ होत्या. देशातील लोकांना आपल्या संशोधनाचा उपयोग व्हावा, या हेतूने त्या भारतात परतल्या होत्या. भारतीय आहारशास्त्रातील पोषक अन्नद्रव्यांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे. महितीपटाचे दिग्दर्शन ‘ईएमआरसी’चे संचालक डॉ. समीर सहस्रबुद्धे यांनी केले आहे. सहाय्यक दिग्दर्शन व संकलन मिलिंद पाटील, संशोधन आणि संहिता अजिता देशमुख यांनी लिहिली आहे. तसेच कॅमेरा अप्पा चिंचवडे, ध्वनी राम जाधव व प्रदीप भोसले, सेट निर्मिती राजेश देशमुख आदींनी केली होती.

डॉ. कमला सोहोनी यांचे भारतासाठीचे योगदान या महितीपटाच्या निमित्ताने सर्वांसमोर आले आहे. ‘ईएमआरसी’ने केलेले हे काम कौतुकास्पद आहे.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ आणि माझे सहकारी यांनी एकत्रित काम करून अत्यंत थोड्या अवधीत या फिल्मसाठी उत्तम काम केले आहे.

- डॉ. समीर सहस्रबुद्धे, संचालक, इएमआरसी

https://www.oberoirealty.com/elysian?utm_source=digital&utm_medium=columbia&utm_term=ELYCLM&ad=0_5687660_ba93739e-2c1f-4d68-9646-99dde929f155-1sj4s_048a2f76-1a85-4051-b290-08932c7ed185-1sjd4_1788_58756452_144_348322_1_144_null_null_18_348011_348020_348006_null_1808_34755&col_ci=R132N802j3211629196104603ca3wdix2276kw4wn95v3k

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT