Savitribai Phule University of Vice Chancellor Dr. Nitin Karmalkar said that the work done by Jai Khamkar, the founder of the College for the Handicapped and Blind is commendable 2.jpg 
पुणे

दिव्यांग व दृष्टीहीनासाठी भारतातील पहिले निवासी महाविद्यालय हे पुणे विद्यापीठात

युनुस तांबोळी

टाकळी हाजी (पुणे) : दिव्यांग व दृष्टीहीनासाठी भारतातील पहिले निवासी महाविद्यालय हे पुणे विद्यापीठात असणे हा विद्यापीठाचा सन्मान आहे. स्वतः दृष्टीहीन असून परिस्थितीशी झगडून दिव्यांग व दृष्टिहिनासाठी महाविद्यालय उभ्या करणाऱ्या संस्थापिका जाई खामकर यांनी केलेले काम गौरवास्पद असल्याचे मत सावित्रीबाई फुले विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर यांनी व्यक्त केले. 

टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे भारतातील दिव्यांगांसाठीचे पहिले निवासी डिजिटल न्यु व्हिजन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन व वृक्षारोपण सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिल्लीचे माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे, माजी आमदार पोपटराव गावडे, मळगंगा संस्थेच्या संस्थापिका जाई खामकर, पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, एम.एस.जाधव, भूमी अभीलेख उपअधिक्षक विनायक ठाकरे, हायर कंपनीचे पंकज चावला, ग्रामविस्तार अधिकारी राजेश खराडे, शोभा मंदिलकर, विमल खामकर, बाळासाहेब चोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

मुळे म्हणाले की, ज्ञानाची दृष्टी देऊन विद्या अलंकाराने दृष्टीहीन व दिव्यांगाना घडविण्याचे काम महत्वाचे असून अशा या महिलेचा आदर्श समाजाने घ्यावा. यासाठी समाजाने देखील संस्थेला योगदान करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रात्साविक दत्ता कारंडे व लहू साबळे यांनी केले. आभार पद्माकर गोरे यांनी मानले. 

या महाविद्यालयाला हायर अप्लायन्स कंपनीने सरंक्षण भिंत 10 लक्ष रूपये, एक वर्गखोली बांधकामासाठी कमल गादीया पाच लक्ष रूपये तर अर्जुन थोरात यांनी 200 नारळ, आंबे, चिक्कूची झाडे संस्थेला दिली. फक्त या परिसरात फळ, फुले अशी उपयोगीता असणारी झाडे लावून परिसर फुलविण्याचे काम करणार असल्याचे खामकर यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Jalgaon News : गुलाबी थंडीची प्रतीक्षा संपणार! ७ नोव्हेंबरपासून जळगावात थंडीचा जोर वाढणार, तापमान १७ अंशांपर्यंत खाली येणार

Latest Marathi News Live Update : मेट्रो वन मार्गावर बिघाड, अर्धा तासापासून मेट्रो साकीनाका स्थानकात खोळंबली

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT