hariprasad chaurasia
hariprasad chaurasia 
पुणे

Video : सवाई स्वरोत्सवाची सुरेल सुरुवात

मंदार कारंजकर

Sawai Gandharva 2019 : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सुरुवात पंडित फिरोज दस्तुर यांचे ज्येष्ठ शागीर्द गिरीश संझगिरी यांच्या गायनाने झाली. उस्ताद अब्दुल करीम साहेबांनी लोकप्रिय केलेल्या किराणा गायकीचा गाभा म्हणजे भाव प्रधानता. ती जपणारे गायक म्हणून दस्तुरजी जाणकारांना परिचित आहेतच. हीच भावात्मकता संझगिरी यांच्या गायनात अनुभवायला मिळाली. त्यांनी मुलतानी रागात केलेली आलापी आणि रागात केलेली शिस्तबद्ध बढत दस्तुरजींच्या तालमीचा प्रत्यय देत होती. गायनात त्यांनी कायम भाव अभिव्यक्तीला अग्रणी ठेवले आणि त्यामुळे त्यांची गायकी श्रोत्यांना विशेष भावली. शुद्ध पिलूमधील ‘सोच समझ नादान’ ही रचना भीमसेनजी आणि दस्तुरजी यांनी अनेकदा सादर केली आहे. गिरीशजींनी ही रचना घरंदाज पद्धतीने पेश केली.

जयंती कुमरेश यांचे सरस्वतीवीणा वादन विशेष रंगले. प्रत्येक वाद्यात काही उणिवा असतात आणि काही जमेच्या बाजू असतात. कलाकाराला जेव्हा वाद्याची बलस्थाने नीट कळली असतात, तेव्हा त्यांचे वादन वेगळ्याच उंचीला पोचते. कुमरेश यांनी केलेली मीन्डयुक्त आलापी सुरेल आणि भावप्रद होती. कर्नाटकी संगीतात साथीदारांचा सहभाग अधिक घट्ट आणि उत्स्फूर्त असतो. घटम आणि मृदंगम यांनी कुमरेश यांच्या सांगीतिक विचारांना श्रोत्यांच्या अधिक जवळ नेले. या सर्व कलाकारांनी केलेले लयीचे कामदेखील वाखाणण्याजोगे होते. गणिताच्या अंगाने वादन करताना अनेकदा रसहानी होते. कुमरेश यांनी तिश्र जातीचे वादन करताना रसहानी होऊ दिली नाही.

अर्चना कान्हेरे यांनी जोगकंस आणि तिलककामोद हे दोन राग प्रस्तुत केले. आवाज साथ देत नसतानादेखील त्यांनी गायन सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तिलक कामोद रागातील दोन्ही बंदिशी सांगीतिकदृष्ट्या उत्कृष्ट प्रतीच्या होत्या.
पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे सुरेल बासरीवादन. श्रेष्ठ कलाकाराच्या लक्षणानुसार, काही क्षणांतच त्यांनी हेमवतीचे स्वरचित्र साकारले.

साधनेच्या जोरावर वय आणि आजारावर मात करता येऊ शकते, याचा प्रत्यय  येत होता. हेमवतीनंतर केलेले बिहाग आणि मिश्र भैरवीचे सादरीकरणदेखील सुरेल आणि रसपूर्ण होते. विजय घाटे यांची तबला साथ पूरक होती. एकंदर, महोत्सवाची सुरवात सुरेल आणि रसिकांच्या आशा उंचावणारी ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Monali Thakur : "या दुःखातून मी सावरेन कि नाही..."; आईच्या निधनानंतर गायिकेने शेअर केली इमोशनल पोस्ट

Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

Snapchat Account Recovery : स्नॅपचॅट डिलीट झालय ? फोटो आणि मेसेज 'असे' मिळवा परत

SCROLL FOR NEXT