‘पी. डीं’च्या नावाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद
अभिनेते सयाजी शिंदे; कऱ्हाडमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’चे वितरण
कऱ्हाड, ता. १७ ः शहराचे सलग ४३ वर्षे नगराध्यक्षपद भूषवणाऱ्या आणि महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी राजकारणी म्हणून नोंद झालेल्या (स्व.) पी. डी. पाटील यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद होत असल्याचे गौरवोद्गार चित्रपट अभिनेते, देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचा पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार अभिनेते शिंदे यांना ज्येष्ठ लेखक अरविंद जगताप यांच्या हस्ते प्रदान झाला. त्या वेळी ते बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपाध्यक्ष प्रतापराव साळुंखे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोक गुजर, शिवाजी शिंदे उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, ‘‘शहरासह ग्रामीण भागात वृक्षारोपणाची चळवळ सर्वत्र पसरली आहे. जिथे राजकारणी भांडत नाही, अशा गावातील सरपंचांनी आमच्याशी संपर्क साधावा, त्यांच्या गावात शेकडो झाडे लावण्यासाठी सह्याद्री देवराई प्रतिष्ठान काम करेल. तालुक्यातील वसंतगड, सदाशिवगड येथेही वृक्षारोपणाचे काम करत आहोत.’’
अरविंद जगताप म्हणाले, ‘‘सयाजी शिंदे यांना मिळालेला पुरस्कार अतिशय मोलाचा आहे. सयाजी शिंदे यांच्या प्रेरणेने आज महाराष्ट्रात शेकडो झाडे लागली आहेत. जिथे झाडं नाहीत, तिथं माणसं जात नाहीत. मात्र, सयाजी शिंदे जिथं झाड नाही, अशाच गावात जाऊन झाडे लावण्याचा प्रयत्न करत आहे. सयाजी शिंदे यांनी झाडांवर प्रचंड प्रेम केले ते नव्या पिढीला समजावे, त्यासाठी असे पुरस्कार आवश्यक आहेत.’’
नगराध्यक्ष यादव म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते. पी. डी. पाटील यांनी दिलेल्या विचारांवर मार्गक्रमण करत आहोत. यापुढेही शहराचा विकास करताना त्याच व्यापक दृष्टीने काम करत राहू.’’
बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘सयाजी शिंदे यांच्या वृक्ष लागवड चळवळी प्रमाणेच सह्याद्री कारखान्याने अनेक वर्ष वृक्ष लागवड करण्याची परंपरा जोपासली आहे. कारखान्याची डोंगरावर असंख्य झाडे लावून ती जगवली आहेत.’’
ॲड. मानसिंगराव पाटील, दिलीप चव्हाण, राजेंद्र माने यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गुजर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भरत महाडिक, प्रा. मृणालिनी शिंदे यांनी परिचय करून दिला. प्रा. डॉ. स्वाती सरोदे यांनी मानपत्र वाचन केले. दिलीप चव्हाण यांनी आभार मानले.
W50744
कऱ्हाड ः सयाजी शिंदे यांना पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना अरविंद जगताप. त्यावेळी बाळासाहेब पाटील, राजेंद्रसिंह यादव, प्रतापराव साळुंखे, डॉ. अशोक गुजर आदी.
.............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.