पुणे

भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सायली कुलकर्णी

CD

SLC26B30294
फोटोओळ : सायली रघुनाथ कुलकर्णी

सोलापूरच्या सायली कुलकर्णी भाजयुमोच्या राष्ट्रीय सरचिटणीस
मुंबई महापालिकेतील विजयाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २६ : भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील नेत्या सायली रघुनाथ कुलकर्णी यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या आदेशानुसार भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार डॉ. हेमांग जोशी यांनी मंगळवारी (ता. २०) ही नियुक्ती जाहीर केली. त्यांच्यावर आता राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सायली कुलकर्णी या मूळच्या सोलापूरच्या असून, भाजपचे माजी प्रदेश संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी यांच्या कन्या आहेत. पक्षाच्या संघटनात्मक कार्यातील अनुभव आणि राजकीय वाटचालीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६० मधून त्यांनी विजय मिळविला होता. या विजयामुळे मुंबईतील स्थानिक राजकारणात त्यांनी आपली ओळख निर्माण केली. आता भाजयुमोच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाच्या माध्यमातून त्यांना देशपातळीवर पक्ष संघटनेत काम करण्याची संधी मिळणार आहे. सोलापूरशी नाते असलेल्या सायली कुलकर्णी यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi reply to Delhi traders : "मोदींना सांगा 'आरोपी नंबर ४' ला हटवा, ३० सेकंदांत आंदोलन थांबवतो!"; १० हजार कोटींच्या नुकसानीच्या पत्रावर राहुल गांधींची थेट अट

Audio Clip: 500 कोटींच्या 'ऑडिओ क्लिप'प्रकरणी SIT स्थापन; 'हे' अधिकारी करणार तपास

Maharashtra Live News: पादचारी मार्ग अन् खड्डे बुजविण्यासाठी ११६ कोटी

Blinkit Fake customer care fraud : फुटलेल्या दह्याचे पैसे परत मागणे पडले महागात! व्हॉट्सॲपवर फोटो पाठवून 'GPay' उघडताच अवघ्या ६० सेकंदांत बँक खाते रिकामे

Pune Water Issue : पुण्यातील पाणीकपात वाढविण्याची गरज नाही; सजग नागरिक मंचाची मागणी

SCROLL FOR NEXT